आमदार बच्चू कडूंसाठी तरूणाने गायले गीत
नागपूर : राजु मदारी या तरूणाने आमदार बच्चू कडूंसाठी गीत गायले. या गाण्याचा व्हिडीओ बच्चू कडूंनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून शेअर केला यामध्ये हा तरूण आमदार बच्चु कडूंसमोर आपल्या कलागुणांची झलक दाखवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना बच्चु कडूंनी लिहिले की, ‘राजु मदारी व त्याचे कुटुंब अनेक वर्षापासुन अमरावती येथे राहतात. आज सकाळी त्यांनी आपल्या कलागुणांची झलक दाखवली. राजुने माझ्याकरीता गायलेले गीत…’
ग्रामीण भागातील घरकुलांसाठी आमदार बच्चू कडूंनी आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधले शहरी व ग्रामीण घरकुलांसाठी समान निकष असावेत अशी मागणी करत त्यांनी तंबूमध्ये बसून हे आंदोलन केले. यावेळी ते पालामध्ये राहिले. त्यामुळे आज ते शहरी व ग्रामीण घरकुल तफावती करीता पालघरात राहून हिवाळी अधिवेशनात हजेरी लावणार. त्यांचे आंदोलनाच्या ठिकाणचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
यावेळी आमदार बच्चु कडू म्हणाले, सरकार आमचं आहे. मला मोठ्या आपेक्षा आहेत. त्यामुळेच हे आंदोलन करतोय. स्वातंत्र्याची 70 वर्ष गेली मात्र या पालामध्ये राहणाऱ्या लोकांच्या पिढ्यान् पिढ्या पालामध्येच आयुष्य काढत आहेत. त्यांच्या या घरामुळे त्यांचे शिक्षण आणि आरोग्य खराब झालं. तर घटनेनुसार या लोकांना निवाऱ्याचा अधिकार आहे. त्यामुळे सरकार कोणतेही असो समस्या महत्त्वाच्या आहेत. अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली.
पुढे आमदार बच्चू कडू म्हणाले की, मी राज्यमंत्री असताना यासाठी प्रयत्ना केले. सरकारच्या माध्यमातून दोन वस्त्यांना जागा, घर आणि रस्तेही दिले.
पण हे राज्यात सर्वत्र बेघर लोकांना पक्के घरं मिळावित मात्र सरकारचं याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरी व ग्रामीण घरकुलांसाठी वेगवेगळे निकष लावले जात आहेत. विधानसभेत बरेचदा आवाज उठवला पण हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. अशी माहिती आमदार बच्चु कडू यांनी दिली.