Shinde-Fadanvis : …म्हणून मुख्यमंत्रीपदी ‘मिंधे ‘ व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’ आणून बसवला, सामनातून टीका

Shinde-Fadanvis : …म्हणून मुख्यमंत्रीपदी ‘मिंधे ‘ व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’ आणून बसवला, सामनातून टीका

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून केंद्रसरकार आणि शिंदे-फडणवीसांवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रसरकारवर मुंबई आणि महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकारचा मुंबईला उद्धवस्त करण्याचा डाव आहे. त्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्रीपदी ‘मिंधे ‘ व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’ आणून बसवला आहे. असे सामनामध्ये म्हटले आहे.

नेमके काय म्हटले आहे आजच्या सामनामध्ये ?

मुंबईतील चांगले ओरबाडून न्यायचे आणि सजवलेले खोके भरून कचरा पाठवायचा असे मोदी शहांचे धोरण आहे. देशातील मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवत आहेतच त्यातच आता मुंबईतील महत्त्वाची कार्यालये देखील ते हलवत आहेत. खरं तर त्यांचा मुंबईच गुजरातला जोडायचा डाव असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

यावेळी शिंदे गटावर टीका करण्यात आली की, पाच-पन्नास खोके वाल्यांनी माती खाल्ली असली तरी मराठी जनता वाघासारखी उसळून येईल. म्हणूनच ते भीतीने पाठिमागून वार करत आहेत. जसे जागतिक नेत्यांच्या मुंबईतील भेटी होऊ न देणे, त्या ऐवजी त्यांना अहमदाबादला नेणे, क्रिकेटची पंढरी मुंबई मात्र परदेशी पाहुण्यांसाठी अहमदाबादला खास क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणे.

Sanjay Raut : केंद्राने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण..,

इंग्रजांप्रमाणे देशात लूट सुरू आहे. त्यावेळी सर्व काही लुटून इंग्लंडला नेले जात होते. आता ते गुजरातला नेले जात आहे. त्यामुळे जसे द्रौपदीचे वस्त्रहरण व्हावे तसे मुंबईचे वस्त्रहरण रोज सुरू आहे. केंद्र सरकारचा मुंबईला उद्धवस्त करण्याचा डाव आहे. त्यासाठीच त्यांनी मुख्यमंत्रीपदी ‘मिंधे ‘ व उपमुख्यमंत्रीपदी ‘होयबा’ आणून बसवला आहे. अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्रसरकार आणि शिंदे-फडणवीसांवर करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube