Karnataka assembly election 2023: आप सर्व जागा लढणार, केजरीवालांकडून घोषणा

  • Written By: Published:
Karnataka assembly election 2023: आप सर्व जागा लढणार, केजरीवालांकडून घोषणा

Karnataka assembly election 2023: नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आज जाहीर झाला आहे. कर्नाटकमधील सर्व जागा आम आदमी पार्टी (पक्ष) लढणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे कर्नाटकामध्ये अनेक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच असणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या या राज्यामध्ये काँग्रेस, आप या पक्षाकडून कंबर कसण्यात आली आहे.

Arvind Kejriwal : डोक्यावर बंदूक ठेवून विचारले, ‘तुरुंगात जायचे की भाजपमध्ये?’

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. येथे एकाच टप्प्यात १० मे रोजी मतदान होईल. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कर्नाटकमध्ये आप सर्व जागा लढणार असल्याचे जाहीर केले केली आहे. दिल्ली, पंजाबमध्ये सत्ता असलेल्या आपने गुजरात विधानसभा लढली होती. परंतु गुजरातच्या मतदारांना आपला नाकारले आहे. आता कर्नाटक या मोठ्या राज्यामध्ये आप रिंगणात उतरणार आहे.

Karnataka Elections : जिथून मोदींना चिथावले तिथेच फोडणार प्रचाराचा नारळ; राहुल गांधींचा भन्नाट प्लॅन

कर्नाटक राज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षात थेट लढत होत असते. येथे जेडीएसची काही ताकद आहे. आता आपही मैदानात उतरणार आहे. विधानसभेच्या २२४ जागा आहेत. सध्या सत्ताधारी भाजपचे ११९ आमदार आहेत. काँग्रेसकडे ७५, काँग्रेसचा मित्र पक्ष जेडीएसचे २८ आमदार आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष भाजपविरोधात आणखी आक्रमक झाला आहे. त्यामुळे भाजप व काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष या निववडणुकीतून पाहिला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube