शिंदेंचं मुख्यमंत्री राहणार, महायुतीमध्ये पुन्हा वाद? मंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत

शिंदेंचं मुख्यमंत्री राहणार, महायुतीमध्ये पुन्हा वाद? मंत्र्यांचे वक्तव्य चर्चेत

Abdul Sattar : लोकसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच महाविकास आघाडी (MVA) आणि सत्ताधारी महायुतीने (Mahayuti) जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच आता राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतुत्वात महायुती लढणार आणि एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तवानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

आज माध्यमांशी बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुका महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आणि जर महायुती पुन्हा सत्तेत आली तर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेणार असं अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी जागा वाटपाबाबत देखील माहिती दिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही भाजपकडे 90 ते 95 जागांची मागणी केली आहे. आम्हाला तेवढ्या जागा मिळाल्याच पाहीजेत असेही अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच शिंदे गटाचा 60 जागांवर विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून सध्या रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही विधानसभा निवडणुकीमध्ये 100 जागा मिळाल्याच पाहीजेत असे वक्तव्य केले होते.

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये शिंदे गटाकडून 100 जागांची मागणी करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अंबानींच्या लग्नाची सुरु होती धुमधाम, अचानक घुसले 2 जण अन् …

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने 07 जगांवर विजय मिळवला होता तर भाजपने 09 जागांवर विजय मिळवला होता आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली होती तर महाविकास आघाडीने 31 जागांवर विजय मिळवला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube