Jitendra Awhad : सनातन धर्मावरुन आव्हाडांचा आदित्यानाथांवर निशाणा

Jitendra Awhad : सनातन धर्मावरुन आव्हाडांचा आदित्यानाथांवर निशाणा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Awhad)यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांच्यावर सनातन धर्मावरुन जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी सोशल मीडियावर (Social Media)एक पोस्ट करत योगी आदित्यनाथांवर निशाणा साधलाय.

आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की ‘सनातन धर्म हाच भारताचा राष्ट्रीय धर्म आहे.विशेष म्हणजे-गायी आणि ब्राह्मणांना संरक्षण देणं एवढंच त्यांच्या ‘सनातन धर्माचं’ धोरण आहे. महिलांवरील अत्याचार आणि अल्पसंख्यांक आणि दलितांवरील अत्याचारातील गुन्ह्यात त्यांचा नंबर एक, तर अल्पवयीन मुलांवरील अत्याचारात नंबर दोनवर आहे. हेच त्यांचे आपल्या देशाविषयीचे विचार. देश जिथे अल्पसंख्यांक, इतर मागास वर्ग, दलित, मुलं, वंचित आणि महिलांच्या सुरक्षेपेक्षा, गायी आणि ब्राह्मणांची सुरक्षा त्यांना अधिक महत्त्वाची आहे.

सनातन धर्म म्हणजे स्पष्टपणानं चातूर्यवर्ण व्यवस्थेचा निर्माण आणि ह्या व्यवस्थेला धुडकावणारा महाराष्ट्र, हे देशातील पहिले राज्य होते. समाजसुधारकांनी सर्वात जास्त विरोध केला तो सनातन धर्म आणि त्यातून निर्माण झालेल्या वर्णव्यवस्थेला योगी आदित्यनाथ स्पष्टपणानं सांगत आहेत की तोच खरा धर्म आहे आणि तो त्या देशाचा धर्म आहे.

ज्या धर्माला सगळ्या संतांनी नाकारलं, ज्या धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारलं, ज्या धर्माला छत्रपती संभाजी महाराजांनी नाकारलं, नंतरच्या काळात फुले, शाहू, आंबेडकरांनी फेकून दिलं. तो धर्म पुन्हा भारतावर लादण्याची भाषा आता योगी आदित्यनाथ करीत आहेत.

या धर्मामध्ये अलुतेदार, बलुतेदार म्हणजेच आजचे बहुजन यांना स्थानच नाही. म्हणजे परत एकदा गावाच्या बाहेर वस्त्या बसतील आणि परत एकदा अस्पृश्यता जन्माला येईल. यांच्या मनात काय आहे? हे आता हळुहळु उघड व्हायला लागलंय. आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ह्या विचारांना विरोध करु असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube