Union Budget 2023 : बजेट नंतर शेरमार्केट सुसाट आणि नंतर पडले

  • Written By: Published:
Union Budget 2023 : बजेट नंतर शेरमार्केट सुसाट आणि नंतर पडले

मुंबई : अर्थसंकल्प सादर होताच शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. सेन्सेक्समध्ये 1100 हून अधिक अंकांची मजबूती पाहायला मिळत आहे. बाजार उघडल्यानंतर लगेचच आणि अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्समध्ये 500 हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळाली. मात्र, नवीन टॅक्स स्लॅब आणि 7 लाखांपर्यंतचे करमुक्त उत्पन्न जाहीर झाल्याने बाजारात मोठी तेजी दिसून आली.

शेअर बाजारात दुपारी 1 वाजता तो 1143.33 अंकांच्या म्हणजेच 1.92 टक्क्यांच्या उसळीसह 60,693.23 वर दिसत आहे. NSE चा निफ्टी 288.90 अंकांच्या म्हणजेच 1.64 टक्क्यांच्या वाढीसह 17,951.05 वर व्यवहार करत होती. गतवर्षी अर्थसंकल्पात शेअर बाजारात फारशी तेजी नव्हती, मात्र यावेळी सरकारच्या घोषणांमुळे शेअर बाजार खूश झाला आणि सेन्सेक्स-निफ्टी उसळला.

दुपारी 1 नंतर मार्केटमध्ये पुन्हा पडजड पाहल्या मिळाली. सेन्सेक्स दिवसाच्या नीचांकी पातळीवर आला तर NSE निफ्टी दिवसाच्या नीचांकी पातळीच्या खाली पाहायला मिळाली. दुपारी 1 नंतर सेन्सेक्स 60750 वरून 59900 पर्यंत खाली आल. म्हणजे 1 तासात मार्केट जवळपास 850 अंकांनी घसरले. तर निफ्टी 17950 वरून 17650 पर्यंत खाली आली.

सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेर्स घसरत आहेत आणि 20 शेर्समध्ये उसळी दिसत आहे. याशिवाय निफ्टीबद्दल बोलायचे झाले तर 40 कंपन्यांचे शेर्स तेजीत आहेत आणि 10 कंपन्यांच्या शेर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

मीडिया, फार्मा, पीएसयू बँक, हेल्थकेअर इंडेक्स व्यतिरिक्त तेल आणि वायू क्षेत्रासाठी बाजाराला फारसे चांगले संकेत मिळालेले नाहीत असे दिसते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube