अजित दादांमध्ये एवढी हिंमत नाही, की ते… बावनकुळे कडाडले

  • Written By: Last Updated:
अजित दादांमध्ये एवढी हिंमत नाही, की ते… बावनकुळे कडाडले

नागपूर : ‘मला वाटलं अजित दादांमध्ये खूप हिंमत आहे. ते लढवय्या आहेत असं वाटलं. पण माझ्या एका दौऱ्यामध्ये त्यांच्यावर एवढा फरक पडला. अजून माझे दौरे बाकी आहेत माझ्या एका दौऱ्यात अजित दादां भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला लागले आहेत. पण अजित दादांमध्ये एवढी हिंमत नाही. की ते माझा करेक्ट कार्यक्रम करतील.’ खरं तर जनता ठरवते कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांवर केले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून कॉंग्रेस-राष्ट्रवादी युती आहे. पण राष्ट्रवादी 75 च्या पुढे जागा मिळवू शकलेले नाही. ते काय करेक्ट कार्यक्रम करणार खरं तर जनता ठरवते कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. आम्ही जनतेला अपिल केलं आहे. बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास नाही. बारामती शहराचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. बारामती मतदारसंघात लोकांमध्ये अजित पवार आणि पवारांच्या वागण्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. पण माझी बारामतीत एन्ट्री झाल्याने त्यांना भीती वाटत आहे. म्हणून त्यांनी विधानसभेत माझा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं म्हटलं पण त्यांच्यात हिंमत नाही. तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम 2024 मध्ये जनता ठरवणार आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी नागपुरात बोलताना सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना यावर परखड शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, अजित पवारांवर खोचक शब्दांत टोलाही लगावला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube