15 दिवसांत सरकार कोसळणार, संजय राऊतांच्या दाव्याला अजितदादांचे उत्तर
Ajit Pawar on Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार 15 दिवसांत कोसळणार या दाव्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली.संजय राऊत कोणत्या सोर्सच्या आधारे म्हणाले ती माहिती माझ्याकडे नाही. मी काही सांगू शकत नाही, असे अजित पवार म्हणाले.
माझी आणि संजय राऊत यांची नागपूरच्या सभेनंतर भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटलो नाही. त्यांना कुठली माहिती मिळाली हे मला माहित नाही. त्यांच्याप्रमाणे अनेक लोक वेगवेगळे वक्तव्य करत असतात. अशी वक्तव्य त्यांच्या अनुभववातून किंवा सोर्सच्या आधारे करत असतात. त्यामुळे ती माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही. अजित पवार हे बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.
शिवसेना ठाकरे गटाची आज पाचोऱ्यामध्ये सभा होणार आहे. यावेळी सभेच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी 15 दिवसांत शिंदे सरकार कोसळणार असं म्हटलं होतं. एकनाथ खडसे यांनी असं म्हटलं की, अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होऊ शकतात. खडसे यांच्या या विधानावर बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण आपआपली गणितं मांडत आहे. आम्ही निकालाची वाट पाहतोय. पण सध्या जे मुख्यमंत्री आणि त्याचं 40 लोकांचं राज्य आहे. ते पुढील 15 ते 20 दिवसांत गडगडल्याशिवाय राहणार नाही.
Ambegaon Election : वळसे पाटील समर्थक देवदत्त निकम राष्ट्रवादीच्या विरोधात मैदानात
मी मागे एकदा सांगितले होते की फेब्रुवारी महिन्यापर्यंत सरकार पडेल पण न्यायालयाचा निकाल उशीरा लागतोय पण हे सरकार टिकत नाही. या सरकरचा मृत्यूलेख लिहिला गेला आहे. डेथ वॉरंट निघालं आहे. आता फक्त सही आणि कुणी करायची हे ठरलं आहे. या सरकारचं डेथ वॉरंट निघालेलं आहे. पुष्पचक्र अर्पण करा, असं भाकित संजय राऊत यांनी केलं.