अजितदादांकडून पंतप्रधानांचे पुन्हा कौतुक, नरेंद्र मोदींनंतर भाजपात कोण?

अजितदादांकडून पंतप्रधानांचे पुन्हा कौतुक, नरेंद्र मोदींनंतर भाजपात कोण?

Ajit Pawar on Narendra Modi : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. त्यामुळे अजितदादा भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. भाजपचा करिष्मा फक्त मोदींमुळेच आहे. त्यांनी देशभर भाजप पोहचवला, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले आहे. पुण्यातील एका मुलाखतीमध्ये त्यांनी देशातील आणि राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य केले.

अजित पवार म्हणाले की भाजप सर्वदूर पोहचवण्याला नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. मोदींचा करिष्मा देशात चालला. त्यांनी विश्वास संपादन केला. भाषणातून जनतेला आपलं करण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाची सुत्र दिली.

कर्नाटक निवडणूक : राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर…

अजित पवार पुढं म्हणाले की एकेकाळी भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखं सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व होतं. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी सारखे दिग्गज नेते होते. पण त्यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही. 1984 नंतर 2014 ला पहिल्यांदा देशात पूर्ण बहुमत असलेलं सरकार अस्तित्वात आलं. मोदींनी करिष्मा निर्माण केला हे मान्य केलं पाहिजे.

अजित पवार म्हणाले की आज भाजपमध्ये मोदींचा करिष्मा आहे. पण नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपात कोण असा प्रश्न विचारला तर कोणतेही नाव पुढं येत नाही. त्यामुळे देशात आता आघाड्याचं सरकार येणार आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार थेट बोलले, 2024 कशाला, आत्ताच मुख्यमंत्री होऊ शकतो…

दरम्यान अजित पवार यांनी 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीची सल बोलून दाखविले आहे. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो. परंतु त्यानंतर कोणीही पक्षातून फुटले नाही. त्यावेळी सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे जबरदस्त काम झाले होते. असेच जबरदस्त काम तिन्ही पक्षाने केले असते. तर सरकार पडले नसते. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री दिसले असते, असे पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube