सरकारमधील तीन मंत्र्याबाबत गैरव्यवहाराची माहिती देणार – अजित पवार

सरकारमधील तीन मंत्र्याबाबत गैरव्यवहाराची माहिती देणार – अजित पवार

ठोस पुराव्यासह बोलणार, फुसका बार नको; अजित पवारांचा संजय राऊतांना टोला

नागपूर : भ्रष्टाचाराचे वेगवेगळे प्रकार समोर योत आहेत. यामध्ये आता सरकारमधील तीन मंत्र्याबाबत गैरव्यवहाराची माहिती आली आहे. त्यासंदर्भातील अधिकची माहिती आम्ही मिळवत आहोत. कारण विरोधी पक्षनेता म्हणून पुराने नसताना विधानं करणं मला योग्य वाटत नाही. ठोस पुराव्यासह बोलणार, फुसका बार नको. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितलं होत. याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असते त्यांनी ठोस पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही, फुसका बार नसला पाहिजे, असे सांगून संजय राऊतांना अजित पवार यांनी टोला लगावला आहे. तर मी म्हटलच नव्हतं बॉम्ब फोडणार आहे. तर फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच आरोप कारायचे अशी आमची भूमिका नाही. असं देखील अजित पवार म्हणाले.

सोमवारी आम्ही आग्रह धरलेला कर्नाटक सरकारविरोधात ठराव आज अधिवेशनामध्ये मांडला जाणार आहे. तसेच आम्ही त्यावर आवश्यक त्या सूचनाही देऊ. कारण महाराष्ट्र- कर्नाटक सीमावर्तीय भागातील मराठी बांधवांना आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत हे कृतीतून दाखवून द्यायचे होतेय शेवटी आज कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला जाणार आहे. अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

राज्यात नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा सध्या दुसरा आठवडा सुरू असून, अधिवेशनामध्ये आज (दि.27) कर्नाटक सरकारविरोधात ठराव मांडला जाणार आहे. या दरम्यान विरोधकांकडून शिंदे- फडणवीस सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितलं होत त्यांनंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारमधील तीन मंत्र्यांबद्दल बॉम्ब फोडणार असल्यााचा गौप्यस्फोट केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube