अजितदादा करणार देवेंद्र फडणवीसांची अमृता वहिंनींकडे तक्रार

  • Written By: Published:
Devendra Fadnavis With Wife Amruta Fadnavis 1663055882

नागपूर : देवेंद्रजी आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल, असा टोमणा अजित पवार यांनी फडणवीसांना लागवला.

ते पुढे म्हणाले की, आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि 18 मंत्री सभागृहात आहेत, पण एकही महिला मंत्री नाही ही किती नामुष्की आहे, हा महिलांचा अपमान आहे.

रात्री लावा फोन दिल्लीला आणि उद्या करा मंत्रिमंडळ विस्तार. पहिल्यांदा आपण दोघांनी चालवलं, नंतर वाढवले, पण अजून 22-23 लोक घेता येतात. ज्यांना कोणाला संधी द्यायची त्याला द्या, पण एक दोन विभाग द्या, पण विस्तार करा.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली.

Tags

follow us