शिंदे गटात सगळे चोर लफंगे आणि कचरा – संजय राऊत
नाशिक :’शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय कचऱ्या समोर मुख्यमंत्री भाषण करतात. तसेच शिंदे गटात गेलेले सगळे चोर लफंगे आणि कचरा, त्याला आग लागते आणि धुर निघतो. समृद्धीच्या टक्केवारीतुन पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्त घामातुन बनतो. मुख्यमंत्र्यांनी बोलावे असे अनेक विषय आहेत. अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर केली आहे.
‘पाच लाख कोटींची गुंतवणुक महाराष्ट्रातुन नेता आणि आमच बिऱ्हाड जर्मनीला गुंतवणुक आणण्यासाठी जाता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाणावर यांची वाचा गेली होती. भाजपाला छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल कधीच प्रेम नव्हते. त्यांच्यासोबत मोंदीचे तुलना करणारे बॅनर लागले होते. असंही खासदार संजय राऊत भाजपवर टीका करताना म्हणाले.
त्याचबरोबर त्यांनी नारायण राणेंवरही सडेतोड टीका केली.’आज सकाळी मी नारायण राणेंना उत्तर दिल्या पासुन त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगल त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझ नाव संजय राऊत आहे. तुम्ही गुंड,तर मी महागुंड , कुठे येऊ, मी कुणालाही घाबरणार नाही, कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही.’
दरम्यान शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत हे पुन्हा अडचणीत आले आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा यांनी मानहानीच्या दाखल केलेल्या दाव्यात राऊतांविरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे. मुंबईच्या शिवडी न्यायालयाने हे वारंट जारी केले आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला ठेवण्यात आली आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याच्या सुनावणीसाठी राऊत यांना हजर राहायचे आदेश न्यायालयाचे होते. त्यानंतरही राऊत न्यायालयात हजर राहिले नाहीत.