“निवडणुकीत जागा दाखवून देऊ…”, शिंदे गटाच्या जल्लोषावर अंबादास दानवेंची खोचक टीका
मुंबई : निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला (Shiv Sena) नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, शिवसैनिक आणखी त्वेषाने याविरोधात लढतील, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना हे पक्षनाव व निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे असल्याचा निर्णय दिला आहे. त्यावर ठाकरे गटातील (Thackeray group) नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.
तर, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनेला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शिवसेना नामोहरण होणार नाही. या संघर्षातून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आणखी झळाळून निघेल. आगामी निवडणुकांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आमची शक्ती काय आहे, हे दाखवून देऊ, असे त्यांनी यावेळी म्हणाले आहेत. तसेच निवडणूक आयोगाच्या निकालामुळे शिवसैनिक शिंदे गटाकडे जातील, असे अजिबात होणार नाही. अजूनही ९९ टक्के शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे हे शिवसैनिक आणखी त्वेषाने लढतील. शिवसेना संकटांना घाबरणारी नव्हे तर संकटांत आणखी ताकदीने उभी राहणारी संघटना आहे.
कालचं शिंदे गटाचा जल्लोषावरून अंबादास दानवे म्हणाले की भाजपाने शिवसेनेचं किती नुकसान तर केलंच आहे. त्यापेक्षाही एकनाथ शिंदेंची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी काल शेवटचा घाव घातला. याचं उत्तर जनता मतपत्रिकेतून देईल आणि भाजपासह शिंदे गटाच्या ४० आमदारांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.