Amol Kolhe Meets Vasant More : अमोल कोल्हे वसंत मोरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

  • Written By: Published:
Amol Kolhe Meets Vasant More : अमोल कोल्हे वसंत मोरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Amol Kolhe Meets Vasant More : पुण्यातील मनसेचे नाराज नेते वसंत मोरे (Vasant More) आणि राष्टवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)  यांची वसंत मोरे यांच्या पुण्यातील घेरी भेट झाली. कोल्हे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे ( Chetan Tupe) पाटील यांनी वसंत मोरेंची भेट घेतली. या भेटीमुळे पुणे शहरात राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. (Amol Kolhe meets Vasant More, sparks discussions in political circles!)

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शिरूर मतदार संघासाठी अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. तसेच काल मनसे नेते वसंत मोरे यांनी पुणे पोटनिवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे या भेटीच्या राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत.

Nitin Gadkari : तब्बल नऊ वर्षांत पहिल्यांदाच गडकरी सहकुटुंब PM मोदींच्या भेटीला

वसंत मोरे हे नेहमीच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. तसेच अमोल कोल्हे हे गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलेच चर्चेत आले आहे. आजची त्यांची भेट ही सदिच्छा मानली जात आहे. अमोल कोल्हे यांचे कात्रज परिसरात कार्यक्रम असल्याने त्यांनी वसंत मोरे यांची भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

अमोल कोल्हे आणि वसंत मोरे यांची भेट ही राजकीय घडामोडींसाठी असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या अचानक भेटीने पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube