…तर वडील मारतील अन् बायको….; मिटकरींच्या दाव्यावर ‘बजरंग बाप्पां’ चा पलटवार

…तर वडील मारतील अन् बायको….; मिटकरींच्या दाव्यावर ‘बजरंग बाप्पां’ चा पलटवार

Beed MP Bajrang Sonwane on Amol Mitkari : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांना फोन केला होता. ते अजित पवारांच्या संपर्कात आहेत असं ट्विट करत माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यावर आता बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane ) यांनी जोरदार पलटवार केलाय. (Amol Mitkari ) अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत सोनवणेंनी मिटकरींचा चांगलाच समाचार घेतलाय.

बजरंग सोनवणे यांनी फेटाळला पिपाणीने राज्यात घेतली 4 लाख मते : साताऱ्यात शिंदेंना फटका लंके, मोहिते, सोनवणे वाचले

लोकसभा निवडणुका झाल्याननंतर आता राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. अजित पवार अन् शरद पवार गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं होतं. हा दावा बजरंग सोनवणे यांनी फेटाळला. तसंच, अमोल मिटकरींवर चांगलाच पलटवार केला.

खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले?

खासदार बजरंग सोनवणे म्हणाले, अमोल मिटकरी हे कोण आहेत? ते अजित पवारांच्या बंगल्यावर एखादे ऑपरेटर आहेत का? ते नेमके कोण आहेत? हे मला माहित नाही, त्यामुळे विचारलं पाहिजे ना अमोल मिटकरी हे कोण आहेत, अशी खोचक टीका बजरंग सोनवणेंनी केलीये. अजित पवारांच्या बंगल्यावर कोणाचा फोन आला याचं रेकॉर्ड ऑपरेटरकडे असू शकतो म्हणून मी म्हटलं मिटकरी ऑपरेटर आहेत का? असंही बजरंग सोनवणे म्हणाले.

ज्यांचा एक खासदार आहे

शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले आहेत. जर माझ्यासारखा एखादा खासदार इकडून निवडून येऊन तिकडे गेलाच, तर त्याला पब्लिक तर मारीनच माझ्या घरात माझे वडील देखील मारतील, असंही बजरंग सोनवणे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. विशेष म्हणजे कोणाला एकमेकाच्या संपर्कात येता येईल? तर ते म्हणजे ज्यांचा एक खासदार आहे, त्यांना आमचे नेते शरद पवार यांच्या संपर्कात येता येईल असा टोलाही सोनवणे यांनी लगावलाय.

 संभ्रम निर्माण करण्याचं हे काम

कुणाला काय राजकारण करायचे ते करू द्या, शरद पवारांची ताकद देशाने पाहिली आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या गटात मी आहे हे यांना पचवता येईना, म्हणून कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचं हे काम आहे, असं म्हणत बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरी यांचा समाचार घेत अजित पवार गटाला टोला लागावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज