Amravati Graduate Election Result : महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

Amravati Graduate Election Result : महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघात पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)  उमेदवार धीरज लिंगाडे (Dheeraj Lingade)  1480 मतांनी आघाडीवर आहेत. भाजप (BJP) उमेदवार रणजीत पाटील (Ranjit Patil) पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येक टेबलवर सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या मतांचे गठ्ठे धीरज लिंगाडे यांचे असल्याचे समजते आहे. पहिल्या निकालामुळे आघाडीत आनंदाचं वातावरण आहे.

अमरावती पदवीधर पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना 23795 तर भाजप उमेदवार रणजीत पाटील 22315 मते मिळाली आहेत. येथील विद्यमान आमदार रणजित पाटील दुसऱ्या फेरीतही 1480 मताने पिछाडीवर आहेत. आता काही वेळातच तिसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे, अमरावती पदवीधर निवडणुकीत भाजपची पिछेहाट होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागणार आहे. नागपूर निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले यांनी आघाडी घेतल्यानंतर समर्थकांचा जल्लोष पहायला मिळतोय. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूर, अमरावती आणि औरंगाबादेत निकाल आघाडीच्या बाजूने गेल्यास राज्याच्या राजकारणावर परिणाम होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube