पवारांनी झटका दाखवलाच; पिचडांच्या सत्तेला जोरदार सुरूंग

  • Written By: Published:
पवारांनी झटका दाखवलाच; पिचडांच्या सत्तेला जोरदार सुरूंग

अशोक परुडेः प्रतिनिधी

Vaibhav Pichad Vs kiran Lahamate : नगर जिल्ह्यातील राजकारणातील मोठे नाव म्हणजे मधुकर पिचड. हे पिचड राष्ट्रवादीमध्ये मोठे नेते होते. अकोले मतदारसंघातून ते सात वेळा आमदार, आदिवासी मंत्री, अहमदनगरचे पालकमंत्री होते. पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. त्यांचा मुलगाही वैभव पिचड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषद सदस्य, २०१४ मध्ये आमदार झाले. पण २०१९ ला वारे फिरले. पिचड-पुत्रांनी राष्ट्रवादीला रामराम करत थेट भाजपचे कमळ हाती घेतले. पण कमळ हाती घेणे पिचडांना फायदाच ठरले नाही. आमदारकी गेलीच पण स्थानिक निवडणुकांमध्ये पिचडांना राष्ट्रवादी हिसका देत आहे. पिचडांना अद्दल घडविणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनीच अकोले येथील एका सभेत बोलवून दाखविले होते. आता हे खरे ठरत आहे.

राम शिंदे- रोहित पवार यांना दोन्ही बाजार समित्यांत 50-50

अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पिचड यांच्या गटाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते सिताराम गायकर यांनी पिचडांच्या ताब्यातून ही संस्था हिसकावली. राष्ट्रवादीला रामराम केल्यापासून पिचडांना पराभवाचे तोंड पहावे लागले होते. तब्बल चाळीस वर्षे सर्व संस्थांमध्ये एक हाती सत्ता असलेल्या पिचडांचा सत्तेचा बुरुज मात्र ढासळला आहे.

शेवगाव बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

एक-एक संस्था त्यांच्या हातातून जात आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस किरण लहामटे यांना उमेदवारी दिली. लहामटे हे दुसऱ्या पक्षातून आले होते. पिचड हे सहज निवडून येतील, असे वाटत होते. पण शरद पवार, अजित पवार यांनी येथे सभा घेऊन पिचडांना पराभूत करण्याचा चंग बांधला. राष्ट्रवादीने लहामटेंना निवडून आणले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या ताकदीवर लहामटे यांनी एक-एक संस्था आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली.गायकर हे पिचडांबरोबर गेले होते. पण तेही पुन्हा राष्ट्रवादीत आले.

मंत्री मुनगंटीवार यांना धक्का, पोंभूर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

गेल्या आठ महिन्यात पिचड पिता पुत्रांना चार मोठे झटके बसले आहे. पहिला झटका हा पिचडांना राजूर या आपल्या गावातच बसला. लोकनियुक्त सरपंचाच्या निवडीत पिचडांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला. विधानसभेनेनंतर लहामटेंनी पिचडांना दुसरा झटका दिला.

त्यानंतर अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीत पिचाडांविरोधात सर्व स्थानिक नेते एकत्र आले. लहामटे यांच्याबरोबर गायकर, अशोक भांगरे यांच्यासह स्थानिक नेते एकत्र आले. या निवडणुकीत पिचडांना धक्का बसला. कारखाना हातातून गेला. या कारखान्यातही पिचड नको म्हणून अजित पवारांनीच जोरदार फिल्डिंग लावली होती.

आता या महिन्यात पिचडांना दोन धक्के बसले आहे. तालुका खरेदी विक्री संघाही पिचडांच्या ताब्यातून गेला आणि आज बाजार समितीही पिचडांच्या ताब्यातून गेली आहे. ज्या शरद पवारांनी पिचडांना चाळीस वर्षे ताकद दिली, त्यांनीच आता त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे.

पिचड पिता-पुत्रांच्या ताब्यात आता अमृतसागर दूध संघ, अकोले पालिका आहे. पिचड यांच्याबरोबर काही जण भाजपात गेले होते.पण तेही स्थानिक नेते नंतर काहीच दिवसांत पुन्हा राष्ट्रवादीत आले. पिचडांचे धडाडीचे स्थानिक नेते, कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर गेल्यानेही
पिचडांना सातत्याने पराभवाचे तोंड पहावे लागत असल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube