मंत्री मुनगंटीवार यांना धक्का, पोंभूर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

मंत्री मुनगंटीवार यांना धक्का, पोंभूर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीचे वर्चस्व

Change of power in Pombhurna Bazaar Committee, shock to Sudhir Mungantiwar : राज्यभरात बाजार समित्यांच्या निडवणुकीत मोठे उलटफेर पाहयाला मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. काल 9 बाजार समित्यांचा निकाला लागला होता. तर आज जिल्यातील पोंभूर्णा, गोंडपिंपरी, भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी पार पडली. मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांच्या क्षेत्रातील पोंभूर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीने मोठं यश मिळवलं आहे. भाजपने समर्थन दिलेल्या शेतकरी आघाडीला केवळ 6 जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) पाठिंबा दिलेल्या पॅनलने 12 जागांवर विजय मिळवत बाजार समितीची सत्ता काबीज केली.

गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बाजार समित्यांचे निकाल समोर येऊ लागले. पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आता समोर आला आहे. पोंभूर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मुनगंटीवार यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे. पोंभूर्णा बाजार समितीत त्यांचे केवळ 6 सदस्य निवडणून येऊ शकले आहेत. तर बारा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक आले. त्यामुळं या बाजार समितीची सत्ता मविआच्या हाती गेली. हा मुनगंटीवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं बोलल्या जातं.

संजय राऊत यांना धक्का: पुण्यातील कोविड सेंटर घोटाळ्यात एकाला अटक

चंद्रपुर जिल्ह्यातील 12 बाजार समितीसाठी निवडणुका पार पडल्या. नऊ बाजार समितींचा निकाल शनिवारी जाहीर झाला होता. यात चार बाजार समितींवर कॉंग्रेसने विजय मिळवला. तर दोन बाजार समितींवर भापजने विजय मिळवला होता. इतर दोन ठिकाणी भाजप-कॉंग्रेस युतीने विजय मिळवला होता.

आज जिल्ह्यातील पोंभूर्णा, गोंडपिपरी, भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी झाली, पोंभूर्णा येथील निकाल धक्कादायक ठरला. मंत्री मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या पोंभूर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेल्या पॅनलला 12 जागांवर विजय मिळवला आहे.

भाजपचा पाठिंबा असलेल्या पॅनलला फक्त 6 जागांवर विजय मिळवता आला आहे.राज्यातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत अपयश मिळालं होतं. मात्र, आता मंत्री मुनगंटीवर यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असलेल्या पोंभूर्णा येथे मुनगंटीवर यांना मोठा धक्का बसला.

दरम्यान, गोंडपिंपरी बाजार समितीत देखील मोठे बदल पहायला मिळाले. गोंडपिंपरीमध्ये कॉंग्रेसच्या हातातून बाजार समिती भाजपकडे गेली. त्यामुळं कॉंग्रेस नेते सुभाष धोटे यांना मोठा धक्का बसला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube