संजय राऊत यांना धक्का: पुण्यातील कोविड सेंटर घोटाळ्यात एकाला अटक

संजय राऊत यांना धक्का: पुण्यातील कोविड सेंटर घोटाळ्यात एकाला अटक

Sanjay Raut Covid Center scam : काही दिवसांपूर्वी पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या (Covid Center scam) प्रकरणात निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता बनावट भागिदारीचे डील तयार करुन निविदा मंजूर केल्याप्रकरणी संजय राऊतांचे (Sanjay Raut) पार्टनर सुजित पाटकर यांच्यासह चोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुजित पाटकर यांचे भागिदार राजू नंदकुमार साळुंखे यांना जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी आज पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे.

किरीट सोमय्यांनी घोटाळा उघडकीस आणला
भाजप नेते किरीट सोमय्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केला आहे.

BrijBhushan Sharan Singh ; ‘पंतप्रधानांनी सांगितले तर मी तात्काळ राजीनामा देईन’

शिवाजीनगर कोविड सेंटरमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. सोमय्यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेने तसेच PMRDA ने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube