Ashok Chavhan : प्लॅन सी अशाेक चव्हाणांवर काय बाेलले फडणवीस

  • Written By: Published:
_LetsUpp (2)

मुंबई ः तुमचा प्लॅन अ-अजित पवार, प्लॅन बी-एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हाेता. ताे पूर्ण झाला. आता तुमचा पुढचा प्लॅन सी-अशाेक चव्हाण (Ashok Chavhan) आहे का, या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले की, सध्या तरी प्लॅन अ, ब, क, ड असे काही नाही. सध्या तरी प्लॅन चांगला गर्व्हनन्स आहे. सध्याच्या सरकारला गर्व्हनन्सवर फोकस करायचा आहे. गेल्या अडीच वर्षापासून राज्याचा विकास जवळजळ थांबला होता. राज्याला आता पुन्हा विकास पथावर आणायचे ध्येय आहे. त्यासाठीच सध्या काम सुरु आहे.

या कार्यक्रमात ते बाेलत हाेते. फडणवीस म्हणाले की, येणार्या २०२४ पर्यंतचे सर्व सरप्राईजेस संपले आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि आपण स्वतः २०२४ मध्ये अनेक सरप्राइजेस देऊ. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले असून, नेमकं शिंदे-फडणवीस अजून काय सरप्राईज देणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर आहेत का? याबाबत खुलासा त्यांनी केला.

Tags

follow us