खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या राऊत यांची अवस्था
जळगाव: संजय राऊत यांना किती गांभीर्याने घ्यावं हा आता खरं तर विचार करण्याचा विषय आहे. वाट्टेल तसं ते बोलत असतात. काहीही बोला, खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या संजय राऊत यांची अवस्था झाली आहे, असा शाब्दिक टोला भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले तर यात एकनाथ शिंदे यांचा बचाव करण्याचा काय प्रश्न आला? असा सवाल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
सकाळपासून तोंड मोकळं सोडायचं व जिभेला हाड नाही म्हणून काहीही बोलायचं, हा संजय राऊत यांचा धंदा झाल्याची टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तसेच रोज सकाळी बातमी पाहिजे म्हणून ते काहीही बोलतात, त्यामुळे संजय राऊत हा गांभीर्याने घेण्यासारखा विषय नाही असा टोलाही यावेळी गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
काहीही बोला, खोटं बोल पण रेटून बोल अशी सध्या राऊत यांची अवस्था असल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. तुम्ही आता काहीही बोला ते आता लोकांना पटणार नाही. कारण लोक ऐकूण बोअर झाले असल्याचा खोचक टोला महाजन यांनी लगावला आहे.