Savarkar Gaurav Yatra : जलील असताना दंगल कशी झाली : सावे

Savarkar Gaurav Yatra : जलील असताना दंगल कशी झाली : सावे

Savarkar Gaurav Yatra : खासदार इम्तियाज जलील यांनी दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात किती गुंड आहेत, हे आधी पाहावे. तसेच ज्या दिवशी दंगल होत असताना स्वत: जलील तिथे असताना दंगल कशी झाली, असा प्रश्न इम्तियाज जलील यांना राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी विचारला आहे.

अतुल सावे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाविषयी अनेक वेळा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अपमान करणारे वक्तव्य केले आहे. सावरकर नेमके कोण होते, त्यांचे कार्य काय होते, हे सांगण्यासाठी तसेच राहुल गांधी हे सावरकर यांच्याबाबत कसे बोलतात हे सांगण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे.

Uddhav Thackeray होय आमची भाजप विरोधात वज्रमुठ… तुम्ही मोदींना घेऊन या… बघू कोण जिंकतय – Letsupp

छत्रपती संभाजीनगरच्या तीन मतदार संघात सहा विभागात ही गौरव यात्रा पुढील सहा दिवस दररोज काढण्यात येणार आहे, असे देखील अतुल सावे यांनी सांगितले. संभाजीनगर येथील सावरकर यांच्या पुतळ्यापासून गौरव यात्रेला सुरुवात झाली. त्यावेळी संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आदी उपस्थित होते.

अतुल सावे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरच्या सहा विभागात ही गौरव यात्रा काढण्यात येत आहे. दररोज या यात्रेत सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक, माहितीपट, चित्रफीत आणि इतर साहित्य याच्या माध्यमातून राहुल गांधी करत असलेले आरोप हे किती खोटे आहेत, हे सर्वसामान्य नागरिकांना सांगण्यात येणार आहे.

(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube