Uddhav Thackeray होय आमची भाजप विरोधात वज्रमुठ… तुम्ही मोदींना घेऊन या… बघू कोण जिंकतय
Uddhav Thackeray : कन्याकुमारीपासून ते काश्मिरपर्यंत आज भाजप सर्व भ्रष्ट लोकांना घेऊन सरकार स्थापन करत आहे. त्यामुळे ते ज्यांचं बोट पकडून, ज्यांच्या जीवावर मोठे झाले आहे. त्यांनाच विसरले आहेत. नव्हे तर त्यांना संपवण्याची भाषा करत आहे. सत्तेची हाव त्यांची भागातच नाही. त्यामुळे त्यांच्या बरोबर जे येणार नाही. त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यंत्रणा लावून त्रास देऊन जेलमध्ये टाकले जात आहे. आमचा पक्ष फोडला, नाव चोरले, चिन्ह चोरून मिंध्ये गटाला दिले. पण तरीही माझे तुम्हाला आव्हान आहे की, येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेऊन या… मी माझ्या वडिलांच्या नावाने मतं मागतो. बघू कोण जिंकतेय ते, असे छत्रपती संभाजीनगर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले.
Ajit Pawar : महापुरुषांचा अपमान… तेव्हा भाजप-शिंदे गटाची दातखीळ बसली होती का? – Letsupp
महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, काँगेसचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं हिंदुत्व शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही. जो माणूस प्रश्न विचारेल त्याला जेलमध्ये टाकायचे, एवढेच काय ते भाजप काम करत आहे. आम्हाला मंदिरात घंटा बडवणारा हिंदू नकोय तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे.
आमच्या सुषमा अंधारे यांच्यावर मिंध्ये गटाचा तो संजय शिरसाट हा खालच्या भाषेत बोलतो. आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करतो. हिंदुत्व हा शब्द उच्चारण्याची शिरसाट याची लायकी तरी आहे का, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला.
(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube