Ajit Pawar : महापुरुषांचा अपमान… तेव्हा भाजप-शिंदे गटाची दातखीळ बसली होती का?

Ajit Pawar : महापुरुषांचा अपमान… तेव्हा भाजप-शिंदे गटाची दातखीळ बसली होती का?

Ajit Pawar : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने केला. आता सावरकर यांचा अपमान झाला म्हणून गौरव यात्रा काढत आहेत. मग, तेव्हा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या मंत्री, आमदार यांनी का नाही निषेध यात्रा काढली. तेव्हा यांची दातखीळ बसली होती का, अशी सडकून टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा छत्रपती संभाजीनगर येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, काँगेसचे बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यावर चौफेर टीका केली आहे.

शिंदे-फडणवीस यांचं सरकार अनधिकृत, अनैसर्गिक आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी स्थिर सरकार हवं आहे. मराठवाडा ही साधू-संतांची भूमी आहे. मराठवाडा मुक्तीसाठी अनेकांनी आपले बलिदान, योगदान दिले आहे.

Dhananjay Munde : कमळाच्या फुलाने जनतेला एप्रिल फुल बनवलं! – Letsupp

अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सभा होऊ शकल्या नाहीत. पण आता राज्यात महाविकास आघाडीच्या विदर्भ, कोकण, कोल्हापूर, नाशिक अशा विभागावर सभा होणार आहे.

राज्यात सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे दुटप्पी राजकारण सुरू आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान झाला म्हणून गौरव यात्रा काढत आहेत. अरे तुमच्यात हिंमत असेल तर सावरकर यांना द्या ना मग भारतरत्न पुरस्कार, तुमच्यात हिम्मत आहे का, केवळ दुटप्पी भूमिका घेऊन शिंदे-फडणवीस काम करत आहेत. मग यापूर्वी आमचे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अपमान भाजपच्याच मोठ्या नेत्यांनी सातत्याने केला. तेव्हा मात्र तुम्ही मूग गिळून गप्प बसले होते. तेव्हा तुमची दातखीळ बसली होती का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

(3) Congress on PM Modi | काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा | LetsUpp Marathi – YouTube

follow us
  • fb
  • instagram
  • youtube