‘Balasaheb Thorat हे मनातून दुखावलेत’, राऊतांची प्रतिक्रिया
काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात( Balasaheb Thorat) यांनी आपल्या विधीमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावरुन अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेब थोरात हे मनातून दुखावल्याने त्यांनी राजनीमा दिला असेल, असे राऊतांनी म्हटले आहे. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बाळासाहेब थोरात हे अत्यंत संयमी, स्वच्छ चारित्र्याचे, संयमी व कर्तृत्ववान नेते आहेत. आम्ही त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांच्या नसानसांत काँग्रेस आहे. थोरातांसारख्या नेत्याने ही भूमिका घेतल्याने ते मनातून दुखावलेत असे दिसतयं, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. तसेच हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. या संदर्भात काँग्रेस हायकमांड नक्कीच विचार करेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.
दरम्यान नाशिक पदवीधरच्या निवडणुकीवरुन हा वाद सुरु झाला आहे. थोरातांचे मेव्हुणे व भाचे सुधीर थोरात व सत्यजीत तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे. या निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी अपक्ष विजय मिळवला असून विजयानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा वाद पहायला मिळता आहे. तसेच थोरात हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. त्यामुळे आगामी काळात थोरातांची काय भूमिका राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.