…तर लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकेल; बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

…तर लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडी जिंकेल;  बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला विश्वास

Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात युती आणि आघाडीत कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बैठका, मिटिंगा, आणि आढाव यावर सर्वच पक्षांनी भर दिला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तर वज्रमूठ सभा घेऊन धुराळाच उडवून दिला. दरम्यान, आता कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीविषयी विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( Balasaheb Thorat said 40 out of 48 Lok Sabha seats will come from Mahavikas Aghadi)

निळवंडे धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यात पोहचल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे गावात पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधत होते. तेव्हा थोरात म्हणाले, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी 40 जागा महाविकास आघाडीच्या येतील. त्यासाठी फक्त ज्या पक्षाची ताकद जिथं आहे, तिथं त्याच पक्षाला जागा द्यावी लागेल. असं झालं तर लोकसभेला महाविकास आघाडीच्या 40 जागा निवडून येतील. शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याच सहकारी पक्षाचं खच्चीकरण न करता महाविकास आघाडीत जो ज्या जागेवर ताकतवान आहे, त्याला ताकद द्यावी लागेल. आम्ही एकत्र लढतोय. त्यामुळं निश्तिच 40 जागांवर आम्ही विजय होऊ…. जनता सध्याच्या कारभाराला वैतागली असून जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळं विजय हा महाविकास आघाडीचाच होईल, असं थोरात म्हणाले.

Kolhapur : तणावपूर्ण शांतता, तगडा बंदोबस्त… : पेटलेल्या कोल्हापूरमध्ये काय आहे सद्यस्थिती?

बाळासाहेब थोरात यांनीही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे. या जागेवरून बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक लढवावी, असं बोललं जात आहे. त्यावर ते म्हणाले की, लोक त्यासाठी आग्रह करतात. पण मी तसा विचार केलेला नाही. आपलं घर सांभाळायचं आणि बाहेर मदत करायची. दुसरीकडे नवे काही करण्याची सवय मला नाही. मी राजकारणात वैयक्तिक वैर ठेवत नाही. मात्र पक्षाकडून काही जबाबदारी असेल तर ती कार्यकर्त्यांना पाळावी लागते, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

गेल्या काही दिवसात राज्याच्या अनेक भागात दंगली झाल्या. या दंगलीवरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आता यावर थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संविधानानुसार सर्व धर्मांना समान हक्क आणि संधी आहेत. सत्तेसाठी धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. कर्नाटकच्या पराभवानंतर राज्यात धार्मिक तणावाच्या घटना वाढल्या आहेत. हा भाजपच्या रणनीतीचा भाग असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली.

दोन दिवसापूर्वी संगमनेरच्या समनापूर गावात समस्त हिंदू समाजातर्फे भगवा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समाजातील नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चानंतर परतत असतांना लोकांवर दगडफेक करण्यात आली. या समनापूर दगडफेकीवरही थोरात यांनी भाष्य केले. संगमनेरला अशात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. संगमनेरची व्यवस्था मोडीत काढून प्रगती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशा घटना देशात आणि राज्यात जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. मार्चोच्या दिवशी सकाळी एका दुकानाची तोडफोड करण्यात आली. मोर्चावरून येतांनाही एका समाजातील तरुण, महिला आणि लहान मुलांना मारहाण करण्यात आली. कोणाच्या तरी सांगण्यावरून हा प्रकार घडला, अशा घटना घडणं हे दुर्दैवी आहे, असं थोरात म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube