पंकजा मुंडेंची खंत : राजकारणात पदावर आणि धर्मात गादीवर नसेल तर लोकं विचारत नाहीत…
Pankaja Munde : पदावर आणि गादीवर नसेल तर लोकं विचारत नाहीत, अशी खंत व्यक्त करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज धर्माचे व्यासपिठ राजकारण्यांनी व्यापून टाकले आहे. तर राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापले आहे. त्यामुळे मला राजकारण्यांना धर्माचे आणि धर्माच्या लोकांना राजकारण्यांचे व्यासपीठावर बंदी केली पाहिजे, असे आता मला वाटायला लागले आहे, असे म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महंतांना टोला लगावला.
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, जे संस्कार सक्षम नसतात ते नितिमत्ता बदलतात. गहिनाथ गड वारकरी संप्रदायाचे हे मूळ आहे. गोपिनाथ मुंडेच्या पोटी जन्म झाला हे भाग्य आहे. नशिबाने मिळाले ते टिकवणे महत्वाचे आहे.
सत्तेत व्यस्त असताना मी गहिनाथ गडाचे कार्यक्रम कधीही चुकवलेले नाही. आता सत्तेत नाही. आता तर तीन-चार दिवस किर्तनात येवू शकते. मात्र, धर्माचं व्यासपीठ राजकारण्यांनी व्यापून टाकले आणि राजकारणाचे व्यासपीठ धर्माच्या लोकांनी व्यापले आहे म्हणून मी जाणे टाळले आहे, असे म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महंतांना टोला लगावला.
Pankaja Munde या धनंजय मुंडेंना सोपे सोडणार नाही… परळीतूनच लढणार ! – Letsupp
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या की, सन २०१८ ला तुमची लेक पालकमंत्री असताना पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आजच्या सरकारने घोषित केलेले २५ कोटी एक रकमी द्यावे. पदावर आणि गादीवर नसेल तर लोकं विचारत नाहीत, अशी खंत व्यक्त करत पंकजा मुंडे म्हणाल्या की, पणं मी भाग्यवान आहे, लोकांचे प्रेम मला मिळत आहे. लोकांनी आग्रह केला म्हणून या ठिकाणी आले.