Raghav Chadha नाही तर ‘हे’ राजकीय नेतेही ‘बॉलिवूड’ अभिनेत्रींच्या प्रेमात
मागच्या आठवड्यात अचानक मुंबईतील एका हॉटेलमध्ये आम आदमी पक्षाचे तरुण खासदार राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा मुंबईतील एका हॉटेलात दिसून आले, त्याचा व्हिडीओ समोर आला, व्हायरल झाला. त्याबरोबर चर्चा सुरु झाली. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा ‘डेट’ करत असल्याची. तर राघव आणि परिणीती यांच्या नात्यासोबतच पॉलिटिक्स आणि बॉलिवूड यांच्यातील नात्यांचा हा आढावा
राघव चड्ढा – परिणीती चोप्रा चर्चेत का ?
काही दिवसापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांच्यासोबत मुंबईतील एका रेस्टॉरंट मध्ये दिसले. तेव्हापासून ते दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला.
त्यावर संसदे परिसरात मीडियाकडून त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावर राघव चढ्ढा यांनी प्रतिक्रिया दिली. “मला राजकारणाचे प्रश्न विचारा, परिणीतीचे नाही.”
अर्थातच अशा उत्तरामुळे चर्चा थांबल्या नाहीत तर वाढल्या. यात भर पडली आणखी एका ट्विटमुळे. हे ट्विट केलं होत राघव चड्ढा यांच्याय पक्षातील एका खासदाराने. आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्विट करून दोघांचे अभिनंदन केले.
खासदार अरोरा यांनी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे फोटो शेअर करत ट्विटमध्ये लिहिले की, “मी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुमच्या पुढील आयुष्यासाठी प्रेम, आनंद आणि सहवास लाभो. माझ्या शुभेच्छा.”
तर यामुळे परिणीती आणि राघव चड्ढा यांचं नातं कन्फर्म मानलं गेलं. पण अजूनही त्या दोघांकडून मात्र त्यांना कन्फर्मेशन दिल गेलं नाही. अर्थात ते पुढच्या काही काळात अशी अपेक्षा आहेत पण यानिमित्ताने एक विषय चर्चेत आला ती म्हणजे राजकीय आणि सिनेसृष्टी यांच्या नात्यातील.
Girish Bapat : पुणे लोकसभा पोटनिवडणूक होणार? संजय काकडे स्पष्टच म्हणाले…
रवी राणा आणि नवनीत राणा
रवी राणा आणि नवनीत राणा हे राज्यात सर्वाधिक गाजलेली जोडी आहे. रवी राणा आणि नवनीत यांची ओळख २००९ च्या दरम्यान मुंबईत झाली. २००९ मध्ये पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले होते, त्या काळात रवी आणि नवनीत यांची ओळख बाबा रामदेव यांच्या शिबीरात झाली होती.
त्यावेळी रवी राणा आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री, मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केलं आहे. रामदेवबाबांच्या योग शिबिरात या दोघांची ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
रवी राणा आणि नवनीत या दोघांचं लग्न अमरावतीत सामुदायिक विवाह सोहळ्यात झालं आहे. असं सांगितलं जात की त्यावेळी ठरवलं असतं तर रवी राणा हे थाटामाटात लग्न करू शकले असते. मात्र या दोघांनी साधेपणाने लग्न केलं आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला. एवढंच नाही तर रवी राणा आणि नवनीत यांनी लग्नाला येणारी खर्चाची रक्कम ही गरीबांमध्ये दान केली.
रवी राणा यांनी २००९ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्यानंतर सलग तीनवेळा त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. रवी राणा यांच्याशी लग्न केल्यानंतर नवनीत राणा या देखील रवी राणा यांच्यासह राजकारणात सक्रिय झाल्या. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेच्या खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांचा पराभव केला. यानंतरही सक्रिय राहत २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून निवडक लढवली. तसंच आनंदराव अडसुळ यांना हरवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
उदय सामंत आणि नीलम शिर्के
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकारमध्ये उदय सामंत मोठी भूमिका बजावत आहेत. पण उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के या अभिनेत्री आहेत. सध्या नीलम शिर्के कुठेच सक्रिय नसल्या तरी त्यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती यासारख्या मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांनी कोणत्याही मालिका किंवा चित्रपटात काम केलं नाही.
Narendra Modi यांच्या फोटोचा शेतकऱ्याने का घेतला मुका? व्हिडीओ व्हायरल…
कुमारस्वामी आणि राधिका कुमारस्वामी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचीही प्रेम स्टोरी एक चर्चेचा विषय आहे. कुमारस्वामी यांनी आपल्यापेक्षा अनेक वर्षे लहान असलेल्या राधिका यांच्याशी लग्न केले. राधिका या कन्नड चित्रपट सृष्टीमध्ये अभिनेत्री आणि प्रोड्युसर आहेत. राधिका कुमारस्वामीने आतापर्यंत ३३ चित्रपटांमध्ये काम केले आहे. कन्नड चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी काही तामिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
२००५ मध्ये मध्ये एका कार्यक्रमात दोघांची भेट झाली होती. त्यानंतर पाच वर्षांनी २०१० साली त्यांनी लग्न केलं. खरंतर कुमारस्वामी आणि राधिका दोघांचेही हे दुसरे लग्न होते.
धीरज देशमुख – दीपशिखा भगनानी
रितेश देशमुख आणि जेनेलिया हि महाराष्ट्राची सर्वाधिक फेमस जोडी आहे. पण रितेश देशमुख यांचा भाऊ धीरज देशमुख यांची पत्नीही सिनेसृष्टीशी निगडित आहे. धीरज यांची पत्नी दीपशिखा भगनानी हि फिल्म प्रोड्युसर आहे. दीपशिखा यांनी आजवर अनेक चित्रपट प्रोड्युस केले आहेत.
स्वरा भास्कर – फहाद अहमद
अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या राजकीय भूमिकेमुळे कायम चर्चेत असते. अभिनेत्री म्हणून काम करत असतानाच ती राजकीय घटनांवर ती भूमिका मांडत असते. पण काही दिवसापूर्वी तिने लग्न केले. स्वराने फहाद अहमद यांच्याशी लग्न केले. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत आणि स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांची ओळख देखील आंदोलनातच झाली होती.
आयशा टाकिया आणि फरहान आजमी
बॉलिवूड मध्ये फार कमी काळात आयशा टाकिया यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. आयशाने ‘टारझन द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे सलमान खानसोबत ‘वॉन्टेड’मध्ये काम केले. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली. आयशाने समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांच्याशी लग्न केले. फरहान आझमी आपला स्वतःचा उद्योग सांभाळत असले तरी राजकारणातही सक्रिय आहेत. फरहान आपल्या वडिलांसोबतच ते समाजवादी पक्षात सक्रिय आहेत.
तशी यादी थोडीच आहे, पण या पलीकडे राजकारण आणि बॉलिवूड यांच्यामध्ये अनेक लव्ह स्टोरीजची चर्चा झाली आहे. काही लव्ह स्टोरीज लग्नापर्यंत पुढे गेल्या, काही लव्ह स्टोरीज मात्र मीडियाच्या बातम्या पर्यंतच राहिल्या.