मर्यादा आहेत अन्यथा…; राऊतांच्या पोपटपंचीवरून गोगावलेंचे खडेबोल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T150446.344

Bharat Gogavalae On Sanjay Raut :  राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय चर्चा केल्या जात आहेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यावरुन आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी यावर भाष्य केले आहे. त्यांनी बोलताना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

आत्तापर्यंत किती वेळा ते असे बोलले आहेत.  गेले आठ महिने ते हेच म्हणत आहे. आजवर त्यांची कोणतीच भविष्यवाणी खरी ठरली नाही. संजय राऊत बोलले आणि खरे झाले असे कधीच झाले नाही. आमचे सरकार मजबूत होत आहे. त्यांच्या पिंजऱ्यातील पोपट काही बाहेर येत नाही. तो मिटु मिटु बोलतो. ते कितीही काही म्हणाले तरी आम्हाला काही फरक पडत नाही आहे. आमची चांगली करमणुक होत आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे.

Pune News : अश्लील रॅप साँगवरून वातावरण तापलं; ABVP कडून विद्यापीठात तोडफोड आंदोलन

तसेच मर्द व  नामर्द काय ते मी सांगितले असते. पण आम्हाला बोलण्याला मर्यादा आहेत. ठीक आहे असू दे. पण आपण जबाबदारीने बोलले पाहीजे. तीन तिगाडा काम बिघाडा असते. हळू हळू पहा काय होते ते. जनतेला कळत आहे आम्ही ठोस पाऊले उचलत आहे.आमच्या कामामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकारयला लागली आहे, असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकासआघाडीविषयी भाष्य केले आहे. त्यावर देखील गोगावलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहे. त्यांना काही दिसायला लागले असेल. नेमके काय चालले ते आम्हाला पण माहिती नाही .राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असे ते म्हणाले आहेत.

“राजकारणात पण काही कुस्त्या चालल्या आहेत” व्हिडीओ शेअर करत फडणवीसांचा इशारा कोणाला?

तसेच १०० टक्के महाविकास आघाडीत फुट पडली आहे. अजित पवार गेले आठ दिवस किती हायलाईट झाले होते. कुठे तरी पाणी मुरते आहे. ते जिरवून घेणे आमचे काम आहे. शिवसेना बाळासाहेबांची आहे. हे सगळ्या जगाला माहिती आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे हे पाकिस्तानला पण माहिती नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन चाललो आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

Tags

follow us