भाऊसाहेब वाकचौरे शिंदे गटाच्या वाटेवर? चर्चा नाकारल्याही नाही, मौन बाळगत थेट फोनच कट केला

Bhausaheb Wakchaure यांच्याशी लेट्सअप मराठीने संवाद साधला त्यावेळी त्यांनी शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर मौन बाळगल्यामुळे चर्चांना आणखी उधाण

Bhausaheb Wakchaure

Bhausaheb Wakchaure heading towards Shinde Shivsen not deny speculation maintained silence and disconnected call : ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (14 जून) मातोश्रीवर पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीपूर्वी एक मोठी बातमी समोर आली होती ती म्हणजे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अचानक नॉट रिचेबल झाले असल्याची. खासदार वाकचौरे अचानक नॉट रिचेबल झाल्याने पुन्हा एकदा राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु झाली आहे. यावर लेट्सअप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर देखील त्यांनी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगलं त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

नेमकं काय म्हणाले भाऊसाहेब वाकचौरे?

माध्यमांनी काय चालवलं मला माहिती नाही. मी दोन्ही वेळेला ऑनलाईन हजर होतो. पण बाकीच्यांचं मला माहिती नाही. यावर तुम्ही मला काहीही विचारू नका मला काहीही भाष्य करायचं नाही. मी फोन ठेवतो. असं म्हणत वाघचौरे यांनी ठाकरे गटाच्या कार्यक्रमांना गैरहजर नसल्याचं नाकारलं मात्र दुसरीकडे शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर देखील त्यांनी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगलं त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा मोठा परिणाम; धास्तीपोटी ग्रामीण भागात सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद

शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 7 खासदार ऑपरेशन टायगरअंतर्गत (Operation Tiger) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर सर्व खासदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

अहिल्यानगरच्या तरुणाचं तुकाराम मुंढे यांना पत्र… मुंढेंकडून थेट ॲक्शन

बैठकीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील सर्व खासदारांना उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले होते. मात्र या बैठकीपूर्वी खासदार वाकचौरे (Bhausaheb Vakchaure) यांचा फोन बंद असल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते.माहितीनुसार, खासदार वाकचौरे हे गेल्या दोन दिवसांपासून कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या घरी सध्या कोणीही नसून त्यांचे स्वीय सहाय्यक देखील त्यांच्यासोबत नसल्याने ते नेमके कुठे गेले आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

राज्यातील राजकारणात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा

तर दुसरीकडे राज्यातील राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची चर्चा जोराने सुरु आहे. ठाकरे गटाचे लोकसभेतील 9 पैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर देखील त्यांनी कोणतेही उत्तर न देता मौन बाळगलं त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे.

follow us