अहिल्यानगरच्या तरुणाचं तुकाराम मुंढे यांना पत्र… मुंढेंकडून थेट ॲक्शन
Letters of Ahilyanagars youth to Tukaram Mundhe रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषध खरेदीची सक्ती मुंढेंना पत्र पाठवताच दिले आदेश
Letter from Ahilyanagars youth to Tukaram Mundhe Mundhe takes direct action : अहिल्यानगर रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे खरेदी करावी लागत होती. मात्र या विरोधात नगरच्या तरुणानी थेट अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र पाठवले व या पत्राची दखल घेत मुंडे यांनी तातडीने सर्व रुग्णालयांना महत्त्वाचे आदेश दिले. औषध खरेदी सक्ती नाही. याबाबतचे फलक राज्यातील सर्व रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात तातडीने लावावे असा आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने मराठी लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव
अनेकदा मोठमोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णाला दाखल करण्यात आल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना संबंधित रुग्णालयातील औषध विक्री विभागातूनच औषधे खरेदी करावी लागत असत याबाबतची सक्ती देखील संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांकडून देखील केले जात असल्याची वारंवार तक्रार देखील नागरिकांनी केले आहे यावर नगर येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी आवाज उठवला व याबाबतची तक्रार त्यांनी थेट एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
दरम्यान भुतारे यांच्या तक्रारीची तातडीने आयुक्त मुंडे यांनी दखल घेतली. रुग्णालयांमधील औषध खरेदीतील सत्तेला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व रुग्णालयांनी त्यांच्या दर्शनी भागात रुग्णांना या रुग्णालयातील औषध विक्री दुकानातूनच औषधी खरेदी करण्याची सक्ती नाही रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून खरे औषधे खरेदी करू शकतात असा स्पष्ट मजकूर लिहिलेला फलक हा दर्शनी भागात लावावे असे आदेश मुंडे यांनी दिले आहे.
सक्ती केल्यास कायदेशीर कारवाई
रुग्णालयाकडून औषधे खरेदीची सक्ती करण्यात आल्यास किंवा डिस्क्रिप्शन देण्यास नकार दिल्यास संबंधित रुग्णालयांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच अशा प्रकारच्या सक्तीचा अनुभव आल्यास नागरिकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन देखील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.