काँग्रेसच्या स्थापना दिनी सुशीलकुमार शिंदेंची मोठी घोषणा
मुंबई : मी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र मी लोकसभा निवडणूक लढणार नसलो तरी मी काँग्रेस पक्षात सक्रिय राहीन. अशी घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी केली. त्यांच्या या घोषणेने चर्चा सुरू झाल्या असून शिंदेच्या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात काँग्रेसकडून कोणता नवा चेहरा येईल याची उत्सुकता लागली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 137 व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापुरातील कॉंग्रेस भवनात कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत हा सोलापुरातील कॉंग्रेस भवनात कार्यक्रम पार पडला. राज्यात ठिकठिकाणी हा कॉंग्रेस भवनात कार्यक्रम पार पडला. मात्र सोलापुरातील कॉंग्रेस भवनात पार पडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 137 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची चर्चा झाली. ती सुशील कुमार शिंदेंच्या या मोठ्या घोषणेची.
तर दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 137 वा वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तब्बल 19 वर्षांनंतर पुण्यातील काँग्रेस भवन येथे भेट देत काँग्रेस नेत्यांना शुभेच्छा दिल्या. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील. माझेही काही आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. असं यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार म्हणाले आहेत.
पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे. काही लोक कॉंग्रेस मुक्त भारत करायच म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील,माझेही काही आहेत. पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. आत्ताचे सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करता आहे. त्यांच्याशी एकजुटीने लढावे लागेल. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजप नेतृत्वावर टीका केली.