मोठी बातमी! फडणवीसांच्या मध्यस्थीने महावितरणाचा संप मागे

मोठी बातमी! फडणवीसांच्या मध्यस्थीने महावितरणाचा संप मागे

मुंबई : अखेर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. त्यानंतर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. हा संप मागे घेण्यासाठी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली. त्याबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, महावितरणचे खासगीकरण करायचे नाही. त्याबद्दल कोणताही विचार नाही. असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला होता. तीन दिवसीय राज्यव्यापी संपामुळं राज्यातील भागांत तांत्रिक बिघाड झाल्यास, आज पहिल्याचं दिवशी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

यातच संप करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकराने आता नोटीस बजावली होती. संपात सहभागी होणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाई करण्याच्या इशारा सरकारने दिला होता. आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून महावितरण, महानिर्मिती या कंपन्यांच अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले होते. याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने या सर्व संघटनांना नोटीस दिली होती. यात त्यांनी मेस्मा लावणार असल्याचं सांगितलं होतं. या अत्यावश्यक सुविधेत अडचण निर्माण करून वीज कर्मचारी संपावर जात असतील तर त्यांच्यावर मेस्मांतर्गत कारवाई केली जाणार होती. त्यामुळं वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, अशी विनंतीही राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी मेस्मा कायद्याचं उल्लंघन केलं, तर मग यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube