उद्धव ठाकरे अन् संजय राऊत हे डिप्रेशनमध्ये; राणेंचा खोचक टोला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T141925.337

Narayan Rane On Sanjay Raut and Uddhav Thackeray :  भाजपच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी ते पुण्यात बोलत होते. उद्धव ठाकरे हा  रिकमाटेकडा माणूस आहे. फक्त अडीच तास मंत्रालयात गेला. ज्या माणसाने अडीच वर्षात एकही रोजगार दिला नाही त्यांने मोदींवर बोलू नये. मोदी रोज  16 ते 18 तास  काम करतात, असे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी कर्नाटक निवडणूक निकालावर देखील भाष्य केले आहे.  लोकशाहीत निवडणुकीत हार-जीत होणं ठरलेलं असतं, असे ते म्हणाले आहे. तसेच याआधी संजय राऊत यांनी शिंदे गटाचा पोपट मेलेला आहे, असे म्हटले होते, त्याला देखील राणेंनी उत्तर दिले आहे. संजय राऊतला काही कामधंदा नाही. संपादक म्हणून त्याची ही भाषा आहे.  पोपट शिवसेनेत होता तेव्हा चांगला होता, भरारी घेत होता. पंखावर काहीतरी  घेऊन मातोश्रीवर यायचा, तेव्हा चांगला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे एक स्टेटस आहे. त्यावर कोणी असे बोलू नये. उद्धव ठाकरे व संजय राऊत हे सध्या सत्ता गेल्याने हे डिप्रेशनमध्ये आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.

गौतमी पाटीलकडून उदयनराजेंना ‘खास’ गिफ्ट…

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देखील टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी मोदीव शाहांमुळे राज्यातील नेत्यांना किंमत असल्याचे म्हटले होते. यावर त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांचे किती आमदार व खासदार आहेत, असा खोचक टोला त्यांनी लावला आहे. आमचे देशामध्ये 302  खासदार व राज्यामध्ये 105 आमदार आहेत. यावर मी आणखी काय बोलावं, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

Cannes Film Festival 2023 : ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ला आजपासून सुरुवात; ‘या’ अभिनेत्रीचा रेड कार्पेटवर डेब्यू!

Tags

follow us