गौतमी पाटीलकडून उदयनराजेंना ‘खास’ गिफ्ट…

गौतमी पाटीलकडून उदयनराजेंना ‘खास’ गिफ्ट…

Gautami Patil Meet Udayanraje Bhosale : गौतमी पाटीलचं (Gautami Patil)नाव माहित नाही असा एकजणही महाराष्ट्रात (Maharashtra)सापडणार नाही. गौतमी कायमच कोणत्यानं कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी अश्लील डान्समुळे तर कधी राजकारण्यांच्या टिकेवरुन पण ती नेहमीच चर्चेत राहते. आता गौतमी एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आली आहे. सोमवारी गौतमी पाटीलनं साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale)यांची भेट घेतली आहे. यावेळी गौतमीने उदयनराजेंना एक खास गिफ्ट (special gift) दिलं आहे. या गिफ्टची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. गौतमीने साताऱ्यातील जलमंदिर या उदयनराजेंच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

Karnataka CM : सुशीलकुमार शिंदेंनी सोडवला कर्नाटकच्या CM पदाचा तिढा; सुचवले 2 मोठे पर्याय

यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीच्या वेळी गौतमीने उदयनराजेंना एक खास गिफ्ट दिलं आहे. या खास गिफ्टबद्दल गौतमीने स्वतःच माध्यमांना माहिती दिली आहे.

उदयनराजेंच्या भेटीबद्दल गौतमी म्हणाली की, उदयनराजे यांच्याशी अचानक भेट झाली. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आले होते. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे.

उदयनराजेंना भेटायला जाताना मी पुष्पगुच्छ घेऊन गेले होते. पण एका सहकाऱ्याने सांगितलं की, उदयनराजेंना परफ्यूम खूप आवडतो, त्यामुळे आता येत असताना मी उदयनराजेंसाठी परफ्यूम विकत घेतला.

उदयनराजे आणि गौतमी पाटील दोघंही महाराष्ट्राच्या मनावर राज्य करतात, अशावेळी उदयनराजेंना भेटून तुला कसं वाटलं? असा प्रश्न गौतमीला विचारल्यानंतर तीनं सांगितलं की, उदयनराजे दादा खूप मोठे आहेत. त्यांच्याबरोबर माझं नाव घेऊ नका, मी खूप लहान आहे. माझी त्यांच्याशी तुलना करु नका, मी एक कलाकार आहे. त्यांना भेटून आज खूप छान वाटलं असंही यावेळी गौतमी पाटीलनं सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube