भाजपच्या भीतीने हे तिन्ही पक्ष एकत्र; चंद्रकांतदादांचा मविआवर हल्लाबोल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T183719.601

BJP leader Chandrakant Patil On MVA :  भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिरुर तालुक्यातील न्हावरे फाटा येथे भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. भाजपची भिती हेच यांचे एकत्र असायचे कारण असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले आहेत.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे आदी नेते उपस्थित होते. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले. तसेच बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका देखील केली आहे.

उरलेली जागा बिल्डरांच्या घशात घालणार का?; कांजूरमार्ग कारशेडवरून आदित्य आक्रमक

भाजपची भिती हीच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांना एकत्र ठेवणारे फेव्हिकॉल आहे. तसेच कसबा मतदारसंघात जरी ते जिंकले असले तरी आगामी काळात त्यांचा प्रयोग यशस्वी होणार नाही, याचा आपण निर्धार करा, असे चंद्रकांतदादा कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.

आगामी काळातील महापालिका, पंचायत समिती, नगर पालिका या सर्व निवडणुकीतील भाजपच्या ताकदीला घाबरुन हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्तापासून नियोजन करावे, असे ते म्हणाले आहेत. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

हे सरकार मूकं, बहिरं, आंधळं: अंबादास दानवे कडाडले

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी देखील विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे पवारांच्या राजकारणाविरोधात आल्याने त्यांच्यावर टीका होत असून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विरोधकांनी त्यांच्या विरोधात कितीही बदनामी केली तरी दादा थांबणार नाहीत, असे बाळा भेगडे म्हणाले आहेत.

Tags

follow us