पहाटेच्या शपथविधीमागे…? या गौप्यस्फोटावर केलेला दावा चंद्रकांत पाटलांनी फेटाळला

पहाटेच्या शपथविधीमागे…? या गौप्यस्फोटावर केलेला दावा चंद्रकांत पाटलांनी फेटाळला

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil ) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते, यामुळे असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावर राजकीय वतृळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरती चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant patil) आपली प्रतिक्रिया दिली आहे,

‘असे गौप्यस्फोट हे त्या त्या वेळी का केले जात नाही. उशिरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो. या संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. 23 नोव्हेंबर 2019 रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

मात्र हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र हा पहाटेचा शपथविधी देशभरात चर्चेचा विषय ठरला होता, आता पुन्हा एकदा जंयत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी असू शकते. राष्ट्रपती राजवट उठवणे आवश्यक होते, त्यामुळे पवरांची ती खेळी असू शकते असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पहाटेच्या थपथविधीमागे शरद पवारांचा हात होता का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube