Pravin Darekar : म्हणून पवार कुटुंबीयांच्या मनामनात फडणवीसांबद्दल द्वेष; आमदार दरेकरांचे टिकास्त्र

Pravin Darekar : म्हणून पवार कुटुंबीयांच्या मनामनात फडणवीसांबद्दल द्वेष; आमदार दरेकरांचे टिकास्त्र

मुंबई : भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar ) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची स्तुती करत पवार कुटुंबियांवर टीका केली आहे. मला वाटतं पवार कुटुंबीयांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रचंड आकस आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये पवारांशिवाय दुसरा कोणी मोठा नेता नाही अशा प्रकारचा त्यांचा एक समज होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन गेले. अशा शब्दात दरेकर यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.
https://youtube.com/live/FMI_RJL6n4A?si=EnSIkaIECMiOmarE
भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी डोंबिवलीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला भाजप आमदार प्रवीण दरेकर हे उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली. दरेकर म्हणाले , फडणवीसांनी गेल्या अडीच वर्षाच महाविकास आघाडी सरकार उलथवून जनतेच्या मनातलं सरकार आणलं. या सत्तातरनंतर स्वाभाविक त्यांच्यामुळे पवार कुटुंबियांच्या मनामनात फडणवीसांबाबत द्वेष भरलेला आहे. त्याचाच प्रत्ययअजित पवार, रोहित पवार कधी सुप्रिया सुळे यांच्या मुखातून येतो.

तसेच दरेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुर्वी पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा कारभार महाराष्ट्राला दाखवून दिला आहे. म्हणून आमची सत्ता पुन्हा राज्यात आली आहे. गृहमंत्री म्हणून या ठिकाणी अत्यंत उत्तम काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चालले आहे. तसेच राज्यात शिंदे फडणवीसांची जोडी उत्तम पद्धतीने काम करते आहे.

यामुळेच आपलं राजकीय भविष्य काय होईल याची चिंता विरोधकांना सतावते आहे. म्हणून अशा प्रकारची टीका विरोधकांकडून फडणवीसांवर केली जात आहे. मात्र विरोधकांकडून आकसने केलेली टीका या पलीकडे या ठीकेला महत्त्व देण्याचे काही कारण नाही, असं दरेकर म्हणाले आहे.

राज्यातील जनतेला विकासावर प्रगती हवी आहे आणि आज तो पूर्ण विश्वास शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी राज्यातील जनतेला मिळतोय. त्याच्यामुळे आम्हाला काय मिळतं आमदारांना हे महत्त्वाचं नाही. सगळे आमदार संतुष्ठ आहेत. या सरकारच्या माध्यमातून लोकांचे काम होत आहेत यातच आमदारांना आनंद मिळतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube