भाजपनं राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींना डावललं, भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भाजपनं राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यक्रमातून मुंडे भगिनींना डावललं, भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

संभाजीनगर : भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपनं मिशन 144 ची सुरुवात केलीय. आजपासून या मिशनला सुरुवात होणारंय. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये येताहेत. संभाजीनगरमध्ये भव्य सभा घेऊन मराठवाड्यातून या मिशनला सुरुवात होणार आहे. दुसरीकडं मात्र, मराठवाड्यातून होणाऱ्या या मिशनमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे व खासदार प्रितम मुंडे यांना डावलण्यात आलंय. जेपी नड्डा यांची आज संभाजीनगरमध्ये सभा होत असून या सभेच्या कार्यक्रमपत्रिकेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांचं नाव टाकण्यात आलं नाही. भाजपनं मुंडे भगिनींना आपल्या या मिशनमधून दूर ठेवलं असून आगामी विधानसभा निवडणुकीतही मुंडे भगिनींचा काहीच रोल नसणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यातच आता कार्यक्रम पत्रिकेतचं नाव नसल्यानं हा वाद पुन्हा एकदा प्रकर्षानं समोर आलाय. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची उपेक्षा सुरूच आहे. मराठवाड्यात होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमातून पंकजा मुंडे यांना वगळलंय.

विशेष म्हणजे फक्त पंकजा मुंडे यांनाच नाही तर त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनाही या कार्यक्रमातून वगळलंय. दोन्ही मुंडे भगिनींची नावं कार्यक्रम पत्रिकेत नसल्यानं मुंडे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलीय. त्यामुळं भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय.

संभाजीनगर येथे कार्यक्रम होत असल्यानं कार्यक्रमाला मराठवाड्यातील नेत्यांना बोलावण्यात आलंय. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची नावं या कार्यक्रमपत्रिकेत आहे. परंतु मराठवाड्यातील नेत्या अद्यापही पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना डावलल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube