‘काँग्रेसच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण’; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका

‘काँग्रेसच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण’; चंद्रशेखर बावनकुळेंची जळजळीत टीका

काँग्रेसला ब्लड कॅन्सर झालायं, त्यांच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचंच राजकारण असल्याची जळजळीत टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) सध्या सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) आज आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षी होण्याची शक्यता मावळली

बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला ब्लड कॅन्सर, काँग्रेसच्या रक्तात संभ्रम निर्माण करण्याचं राजकारण असून 65 वर्षे सरकार चालवलं काँग्रेसने लोकांना संभ्रमातच ठेवलं आहे. ज्या लोकांना काँग्रेसने संभ्रमात ठेवलं त्या लोकांचं मनपरिवर्तन आम्ही करणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

Letsupp Special : औषध खरेदीचा घोळ; संचालक पदही रिक्त; राज्यात आरोग्य सेवेचा बोजवारा

तसेच इंडिया आघाडीमधील घटक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सत्तेत आल्यानंतर हिंदु समाज, संस्कृतीचा नायनाट करणार असल्याची घोषणाच केली आहे. स्ट्रलिनच्या पक्षाने असा संकल्पच केला आहे, त्यावर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, उदयनिधीने केलेलं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी मान्य आहे का? असेल तर त्यांनी जनतेत या नाहीतर युती तोडा, असं खुलं चॅलेंजच बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

यावेळी बोलताना बावनकुळे यांनी इतरही विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. जनगणनेचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. जातिनिहाय जनगणनेचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. केंद्र सरकार फक्त जनगणना करतं, पण जातिनिहाय जनगणना करण्याचा अधिकार राज्याला असून घटनेप्रमाणे एसएसी एसटी आणि इतर अशा जनगणना झाल्या असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीतील सर्वच घटक पक्षांना उमेदवार सांगण्याचा अधिकार आहे, कोणती जागा कोणाला जाईल याचा निर्णय वरिष्ठ घेतली, पण जागा कोणालाही जावो, त्या जागेवर भाजप संपूर्ण ताकदीने लढणार असून राज्यातील 45 खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे असतील, असा विश्वासच बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube