कुटुंबाच्या मोहात तर तुम्ही अडकला, म्हणूनच तुमची ही गत; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Untitled Design   2023 04 24T081358.675

Chandrasekhar Bavanukale On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील सभेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), त्यांचे समर्थक आमदार आणि भाजपवर (BJP) जोरदार शब्दात हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या भाषणात आपल्या खास ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर एकेरी भाषेमध्ये विखारी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे (Chandrasekhar Bavanukale) चांगलेच संतापल आहे. बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव सन्मानाने घेत, जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुमची गत काय झालीये, अशी आठवण करून देत जोरदार निशाणा साधला आहे.

कालच्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्यावर आरोप होतात, की मी घरी बसून सरकार चालवलं. पण मी घरी बजून जे केलं ते तुम्ही वणवण फिरून करू शकला नाहीत, अशी टीका करत ते म्हणाले की, मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होता. म्हणून ही जनता इथं आली आहे. पुढे बोलतांना त्यांनी घराणेशाहीवरून मोदींवर निशाणा साधला. घराणेशाहीला एक परंपर असते. तुला आगे ना पिछे, तुला कोणी नाही आहे. कधी झोळी लटकवशील आणि निघून जाशील. पण माझ्या जनतेच्या हातात भिकेटा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? असा एकेरी उल्लेख करत त्यानी टीका केली होती. या टीकेनंतर भाजपच चांगलीच आक्रमक झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी ट्विट करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. उध्दवजी, आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांचा एकेरी उल्लेख करीत म्हणालात की, मोदीच्या मागे-पुढे कोणी नाही, आपण हे विसरलात का, आदरणीय मोदीजींच्या सोबत देशातील कोट्यावधी जनतेचे आशिर्वाद आहेत. हा देशच कुटुंब आहे. लहानपणीच कुटुंबाचा त्याग केलेल्या माणसाला कुटुंबाचा मोह कसा राहणार? कुटुंबाच्या मोहातत तर तुम्ही अडकला आहात. म्हणूनच तुमच्या जवळची माणसे सोडून गेली आणि तुमची ही गत आहे, असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलं.

Weather Update : पुढील पाच दिवस राज्याला पुन्हा अवकाळी झोडपणार, हवामान विभागाचा अंदाज

या सभेत बोलतांना ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेवरही टीका केली. ते म्हणाले, आमचं सरकार हे देणारं आहे, घेणारी नाही, असं मिंधे म्हणतात. पण काय देताय तुम्ही? इथल्या जनतेला विचारा की, मी तुम्हाला जवळच वाटतो का? मी तुम्हाला जवळचा वाटतो? असं म्हणत उध्दव ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला. दरम्यान, या टीकेवर आता शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us