Chandhrashekhar Bavankule : प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य विक्षिप्तपणातून!

Chandhrashekhar Bavankule : प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य विक्षिप्तपणातून!

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे  विक्षिप्तपणातून केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, अशी सडकून टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली. तसेच प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत बोलले हे त्यांच्या मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे, असेही बावनकुळे म्हणाले.

नागपूर येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले असता ते पदवीधर निवडणुकी संदर्भात बोलत होते. चंद्रशेखर बावनकळे म्हणाले की, आमच्या नेतृत्त्वावर टीका टिपणी केली तर राज्यभरात प्रकाश आंबेडकर यांचा निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे त्याचा उद्रेक होईल असं वाटत आहे.

यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीत या जागांवर जे निकाल आले, त्यापेक्षा उद्याचे निकाल चांगले असणार आहेत. सहा वर्षांपूर्वीच्या निकालात आणि यंदाच्या निकालात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीला जास्त यश मिळेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

बावनकुळे म्हणाले की, चार जागा आम्ही लढवल्या होत्या. नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिले होते आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिले होते. स्थानिक स्तरावर सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केली आहे. त्यामुळे निकाल चांगले येतील.

सत्यजित तांबे पूर्ण मानसिकतेने आमच्याकडे आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे. सत्यजित तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले. सत्यजित तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. सत्यजित तांबे आले तर आम्ही स्वागत करु, असे चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube