कितीही मशाली लावा मोदींच्या वादळात त्या विझणारचं; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 24T120852.858

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल जळगावातील पाचोरा येथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या वादळासमोर तुमची मशाल विझून जाईल, असे ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी थोडा अभ्यास केला पाहिजे. जगातील 150 देशांनी 78 टक्के पसंती मोदींजींच्या नेतृत्वाला दिली आहे आणि हे मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदींचे वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील.  हे त्यांना माहित आहे, म्हणून सतत मोदींचे नाव घेत असतात. मोदींची ऊंची केवढी आपली ऊंची केवढी याचा जरा विचार करा. तुमच्याजवळ 2 लोक रहायला तयार नाही, अशा शब्दात बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे की शिंदे धनुष्यबाण कोणाचा? चिन्हासंदर्भातील आजची सुनावणी रद्द

2024 मध्ये मोदींचे वादळ येऊ द्या. तेव्हा तुमची मशाल कशी विझणार नाही ते बघू आपण. तुम्ही कितीही मशाली लावा त्या सगळ्या मशाली विझणारचं, असे म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंना इशारा दिला आहे. त्यामुळे तुम्ही मोदींची बरोबरी करु नका. तुम्ही धृताराष्ट्रासारखे आंधळे झाले होतात. सत्तेच्या मोहात तुम्हाला फक्त तुम्ही व तुमचा मुलगा एवढेच दिसत होते, अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : आम्ही जी नशा करतो, ती तुम्हाला पराभूत करण्याची नशा; तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलता

तसेच तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळू शकले नाही. त्यात आमचा काही दोष नाही. मागची 5 वर्षे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी ठाकरेंवर भावासारेखे प्रेम केले. त्यांना कुठेही मागे ठेवले नाही. याऊलट आमचेच तुमच्यावर उपकार आहेत. 2014 व 2019 साली आमच्यामुळे तुमचे आमदार व खासदार निवडून आले, असे म्हणत बावनकुळेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Tags

follow us