अविश्रांत काम कामाचा ताण, मुख्यमंत्री पडले आजारी; राजकीय चर्चांना उधाण
प्रफुल्ल साळुंखे
(विशेष प्रतिनिधी)
Chief Minister Eknath Shinde ill : गेल्या काही महिन्यांपासून अविश्रांतपणे काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे थोडे थकले आहेत. गेल्या काही दिवसात झालेले दौरे, सततचा प्रवास यामुळे त्यांना थकवा जाणावत आहे. म्हणून त्यांनी गेल्या दोन दिवसांतील त्यांचे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आजदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करुन विश्रांतीसाठी वर्षा निवास्थानी थांबणे पसंत केले आहे.
जून महिन्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केली होती. त्यामुळं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या दिवसापासूनच त्यांनी कामाचा सपाटा लावला होता. बैठका, कामं, उद्घाटनं यासारखे विविध कार्यक्रमांनी त्यांचा दिवस कायम व्यस्त असायचा. मात्र, या रोजच्या व्यस्त दिनक्रमामुळे आणि सततच्या धावपळीमुळं शिंदे यांना थकवा जाणवत आहे. त्यामुळं त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अनेकदा मुख्यमंत्री यांच्या अविश्रांत कामाबाबत चर्चादेखील झाली. यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी मी 24 तास उपलब्ध असणारा मुख्यमंत्री आहे असं, असं सांगितलं होतं.
Madhur Bhandarkar: ‘सर्किट’ सिनेमाचा धमाका होणार; निर्मात्यांनी सांगितले त्यामागील रहस्य
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांची झालेली धावपळ सर्वांनी अनुभवली. त्याच रात्री तीन वाजता परत येऊन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा अवकाळी पाऊस झालेल्या भागांचा दौरा केला होता. खान्देश, मराठवाडा, अहमदनगर असा दौरा पूर्ण झाल्यावर लगेच मंत्राललयात बैठक घेण्यासाठी ते सज्ज झाले होते. दरम्यान, काल अस्वस्थ वाटत असतानादेखील त्यांनी बच्चु कडू आणि अजित पवार यांच्यासोबत प्रदीर्घ बैठका घेतल्या. या बैठकीनंतर मुख्यमंत्री सरळ वर्षा निवास्थानी गेले.
आपण आजारी आहात का असा प्रश्न पत्रकार यांनी विचारला असता. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपण ठणठणीत आहोत, असं सांगितलं. दरम्यान, गेल्या दोन दिवसात राज्य सरकारविषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. उद्भव ठाकरे-शरद पवार यांची झालेली भेट, सरकार गडगडणार याविषयीच्या सुरू असलेल्या चर्चा अशाचतच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केल्यानं तर्कवितर्कांना उधाण आले आहे.