“होय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले” आदित्य ठाकरे यांनी सांगितला घटनाक्रम

  • Written By: Published:
“होय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले” आदित्य ठाकरे यांनी सांगितला घटनाक्रम

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी हैद्राबाद येतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा किस्सा सांगितला. त्यावर पुन्हा एकदा राजकीय सत्तातरावर चर्चा सुरु झाली. काल मुंबई येथील एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा हा प्रसंग सांगितला.

‘मुंबई तक’ या वाहिनीच्या बैठक कार्यक्रमात ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यात आदित्य ठाकरे यांनी विविध प्रकारच्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले, या प्रसंगाचा पूर्ण घटनाक्रमाचं ठाकरे यांनी सांगितला.

शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते का?

या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांना एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते का? असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर दिले. त्यावेळी ते म्हणाले की नोव्हेंबरमध्ये उद्धव साहेबांची सर्जरी ठरली होती. पहिली सर्जरी झाल्यानंतर दुसरी सर्जरी तात्काळ करावी लागली होती. त्यानंतर पुढचा जो दीड ते दोन महिन्यांचा काळ होता उद्धव साहेब कोणाला भेटू शकत नव्हते. पण या काळात उद्धव ठाकरे व्हीसीवरून संपूर्ण कामे करत होते.

लग्न कधी करणार… आदित्य ठाकरेंचे भन्नाट उत्तर…

पण या काळात उद्धव ठाकरे जरी लोकांना भेटत नसले तरी, “मी जी ही गँग आहे त्यांना भेटायचो” पण त्यावेळी या 40 जणांचे जे गँग लीडर आहेत त्यांना वाटलं की, उद्धव साहेब परत उभे राहू शकणार नाही. किंवा पक्ष पुन्हा उभा राहू शकणार नाही.”

आमदारांना फंड दिले आणि…

आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांनी दिवाळीत आमदारांना जे काही द्यायचं होतं ते दिलं. हे सगळं कानावर येत होतं. हे कानावर येत असताना तरीही आम्हाला विश्वास बसत नव्हता.’ ‘दोन-तीन आमदार आम्हाला सांगत होते. तुम्ही लक्ष का नाही ठेवत. आम्हाला पैसे का देतात?’

तरीही आम्ही लोकांना सांगायचो, ते मंत्री आहेत. त्यांना तुम्हाला फंड द्यावा लागतो. तुम्ही सगळे काम करत असतात. कारण या आमदारांवर विश्वास ठेवायचा की, ज्या व्यक्तीला आपण सगळं दिलंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न होता.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे अनेक आमदार संपर्कात; फडणवीसांनी दिले मेगाभरतीचे संकेत, पक्ष प्रवेशाची वेळही सांगितली

तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का?

आदित्य ठाकरे यांनी पुढं सांगितलं की 20 मे रोजी त्यांना उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावलं होतं. त्यावेळी त्यांना विचारलं की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का?’

‘हे सगळं जे काही चाललं आहे.. या ज्या काही घडामोडी आहेत पक्ष काही परत उभा राहणार नाही.. उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहणार नाही.. हे का कानावर येतंय? काय नक्की तुमचा प्रॉब्लेम आहे.’

…आणि एकनाथ शिंदे रडले

उद्धव ठाकरे यांनी त्यांना असा प्रश्न विचारताच, ते समोरच रडले. म्हणाले की मला जेलमध्ये जाण्याचं हे वय नाही. मी तुमचाच आहे. मी कुठे जाणार. पण मी नुसता सांगून आलोय. कारण सांगावं लागतं. अशी कारण त्यांनी सांगितल. असा प्रसंग आदित्य ठाकरे यांनी सांगितला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube