Eknath Shinde : ‘मी आरोपांना कामानं उत्तर देतो, म्हणून यश मिळतं’, मुख्यमंत्र्यांचा दावा

Eknath Shinde : ‘मी आरोपांना कामानं उत्तर देतो, म्हणून यश मिळतं’, मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Govt) सत्तेत आल्यावर उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री यांच्यात कटुता वाढत गेली. दोघांकडूनही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असतात. तसेच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हे दोघांमधील कटुतेत आणखी वाढ झाली आहे. ‘माझं व्हिजन… माझा महाराष्ट्र’ या कार्यक्रमात एकनाथ शिंदेनी (eknath shinde ) दावा केला आहे.

राजकीय पक्ष राजकीय पक्षांचे नेते परस्परांविषयी खालच्या पातळीवर जाऊन सध्या बोलताना दिसत आहेत, याचाच परिणाम समाजाच्या राजकारणात होऊ लागला आहे, तरुण मुलांवर कायप्रकारे होत असेल असं विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, “मी सांगतो मी आरोपांना कामाने उत्तर दिलं आहे. कायदा आणि एखाद्यावर मर्यादा किंवा बंधन घालून होणार नाही. प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण केले पाहिजे.

आपण काय करत आहे, आपण चांगलं, बोलतोय की वाईट बोलतोय. लोकांना हे बिलकुल आवडत नाही. आम्ही बघा आरोपांना कामाने उत्तर देतो, म्हणून ग्रामपंचायतमध्ये दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाल्या आहेत. मला अभिमान आहे याचा लोकांनी सपोर्ट केला आहे, असं मुख्यमंत्री एक नाथ शिंदेनी यावेळी दावा केला आहे.

पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही उठाव केला नाही, प्रत्येकाचे वेगवेगळ्या पक्ष असणार कोणी विरोधात देखील असेल. परंतु आपण आपली जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती कधीही सोडता कामा नये. एक पातळी ठेवून कोणी काय बोललं पाहिजे. मी पातळी सोडून कधीही बोलत नाही. मी त्यांना नेहमी एकच सांगत असतो बाबा, मी एक साधा कार्यकर्ता आहे. तुम्ही आरोप करत रहा मी काम करत राहीन. आम्ही बघा आरोपाला कामाने उत्तर देत असतो, म्हणून ग्रामपंचायतमध्ये सध्या दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत मिळाले आहेत. मला अभिमान आहे, याच लोकांनी मला कायम सपोर्ट केला आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube