शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

कोल्हापूर : शिवसेना फूटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर सतत हल्लाबोल करत असतांना मिंधे गट असा शब्दप्रयोग वापरुन टीका करत असतात. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटात अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मिंधे गट म्हणूनच टीका करत आहे. मात्र, यावर आजवर शिंदे गटाच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा  आमदाराने, प्रवक्त्याने प्रतिउत्तर केला नव्हता. परंतु आज कोल्हापूर येथे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यांदाच आक्रमक अशी भूमिका घेतती आहे.

उद्धव ठाकरे स्वतःच मिंधे असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळसाहेबांचा वारसा सोडला आहे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा वारसा घेत असल्याची जहरी टीका शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. कोल्हापूर येथे दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे. दीपक केसरकर म्हणाले की, पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.

कोल्हापूर हा महाराष्ट्रात आणि देशात पहिला जिल्हा बनावा, याकरिता प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. कोल्हापूरचं वैभव वाढलं पाहिजे, त्यासाठी राज्य सरकार जोरदार काम करत आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहे, राज्यात ५० शाळांच्या विकासात कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलचा समावेश केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. बाळासाहेब यांचा वारसा गेला आहे. आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः मिंधे झाले आहेत, हे सध्या बघायला मिळत आहे. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत,अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

हिंदुत्वपासून दूर व्हा, हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं नाही. यामुळे उद्धव ठाकरे उत्तराधिकारी कसे होऊ शकतात ? असा प्रश्न केसरकर यांनी उपस्थित केला आहे. सेना आणि भाजपची युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली होती, परंतु शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई यांच्याबद्दल कधीही वाईट बोलणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी उत्तराधिकारी ठाकरेचं असं सांगितलं होतं, त्यावर दीपक केसरकर यांनी टोला लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube