…तर माणूस मुख्यमंत्री होतो, फडणवीस स्पष्टच बोलले!

…तर माणूस मुख्यमंत्री होतो, फडणवीस स्पष्टच बोलले!

बीड : मला कुठलंच व्यसन नाही असे सांगताच विनायक मेटे म्हणाले, लोकांना दाखवून द्यायचं आहे की, व्यसन केलं नाही तर माणूस मुख्यमंत्री होऊ शकतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेंटेंच्या आठवणींना उजाळा दिल्या.

दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. दरम्यानमेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ताकतीने शिवसंग्रामच्या मागे राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण झाली होती. त्यांना नमन करत स्वर्गीय विनायक मेटे यांना आदरांजली देखील वाहिली. मात्र या कार्यक्रमाला मुंडे भगिनी इकडे फिरकल्याही नाहीत. त्यामुळे त्याची विशेष चर्चा होतेय.

फडणवीस म्हणाले, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत केले जात असतांना तळीरामांकडून पार्ट्या केल्या जातात. वेगवेगळ्या स्वरूपाची नशाही केली जाते. त्यामुळे याच काळात नागरिकांनी व्यसनापासून दूर व्हावे याकरिता विनायक मेटे यांनी व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजन करण्यास सुरूवात केली. हाच उपक्रम त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही सुरूच ठेवला.

विनायक मेटेंच्या आठवणींना उजाळा देताना फडणवीस म्हणाले, 2015 साली मी मुख्यमंत्री होतो तेव्हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करायचा संकल्प केला, 31 डिसेंबर रोजी दारू आणि इतर व्यसनाची पार्टी केली जाते. चरस गांजा ओढण्याचा प्रयत्न करतात, म्हणून दारू नाही तर मसाला दूध घेतले पाहिजे, ही संकल्पना विनायक मेटे यांची होती. आज कार्यक्रमाला आलो मात्र दुर्दैवाने मेटे साहेब नाहीत, ज्योतीताई मेटे यांनी मला फोन करून निमंत्रन दिलं, हा वसा तुम्ही पुढ नेताय म्हणून या कार्यक्रमाला आलोय.

व्यसनमुक्तीवर फडणवीसांनी तरूणाईला आवाहन केले. ते म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या देशासोबत युद्ध होत नाही म्हणून पाकिस्तान अमली पदार्थ पाठवून व्यसनाधीन करत आहे. दारूने संसार उद्धवस्त होत आहेत, सिगारेट तंबाखू ही स्टाइल झाली आहे, हे करताना आपण नट दिसतो असे प्रत्येकाला वाटते आहे, हळू-हळू भारत कॅन्सरची राजधानी होत आहे. पान बिडी तंबाखू अमली पदार्थ कुठलाही व्यसन करू नका, क्रांतिकाराना भारत माता स्वतंत्र करण्याचा व्यसन होते, दारू पिऊन आल्यानंतर फार मोठी ताकद दाखविण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दोन फाईट पडल्यावर ते धारशिवी पडतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube