अमित शाह-जयंत पाटील यांच्या भेट झाली की नाही? फडणवीस स्पष्टच बोलले

अमित शाह-जयंत पाटील यांच्या भेट झाली की नाही? फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Dadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शाह यांच्या दौऱ्याचा पुणे दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. दरम्यान, आज सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांना भाजपने महायुतीत येण्याची ऑफर दिल्याचेही बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर खुद्द जयंत पाटील यांनीच यावर स्पष्टीकरण देत या वृत्ताचं खंडन केलं. (devendra fadnavis  on amit shah jayant patil regarding-meeting discussion)

https://www.youtube.com/watch?v=qnJFFUhQCYQ

अजित पवारांनंतर आता जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधान आलं आहे. या सर्व चर्चांवर जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतली नसल्याचे स्पष्ट केलं. यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह-पाटील भेटीच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

तिलक वर्माने सावरले; वेस्ट इंडिजसमोर 153 धावांचे लक्ष्य 

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांना जयंत पाटील हे अमित शाहांनी भेटले का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले, मला वाटते की काही लोकांना अफवा पसरवायला फार आवडतं. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी किमान खात्रीपूर्वक बातमी द्यावी. जयंत पाटील आणि अमित शाह यांची भेट झाली नाही. जे पतंगबाजी करता, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी आपला काहीतरी स्तर राखावा. तसेच घटनेची पृष्टी केल्यानंतरच अशा प्रकारच्या बामत्या द्याव्या, असं फडणवीस म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतही फूट पडली. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करत भाजपशी युती केली आणि करून सत्तेत सहभागी झाले. यानंतर जयंत पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात सुरू होती. मात्र, त्यानंतर खुद्द जयंत पाटील यांनी या वृत्तांचे खंडन केले. त्यानंतर फडणवीसांनी ही भेट झाली नसल्याचं सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube