‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल, त्यांना चिंतेंचं कारण नाही; मात्र….’; नोटबंदीच्या निर्णयावर फडणवीसांचा इशारा

‘ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल,  त्यांना चिंतेंचं कारण नाही; मात्र….’; नोटबंदीच्या निर्णयावर फडणवीसांचा इशारा

Devendra Fadnavis On Reserve Bank Decision : केंद्र आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बॅंकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2000 रुपयांच्या नोटबंदीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल, त्यांना चिंता करण्याचं कारण नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणीस यांनी आरबीआयच्या निर्णयावर बोलतांना सांगितले की, 2000 रुपयांची नोट ही सर्कलुशेनमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या नोटांना अजून अनाधिकृत ठरवलेलं नाही. आक्टोबरपर्यंत या नोटा सर्कुलेशनमधून बाहेर काढायची आहे. त्यामुळं आक्टोबर पर्यंत या नोटा बॅंकेत बदलवता येणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितले.

केंद्राची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव; 12 तासांत केजरीवाल सरकारची दुसऱ्यांदा कोंडी

फडणवीस म्हणाले की, ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील, ज्यांच्याकडे पांढरा पैसा असेल, त्यांना चिंता करण्याचं कारण कुठलंही कारण नाही. मात्र, काळा पैसा ज्यांच्याकडे आहे, त्यांना नक्कीच त्रास होणार आहे. कारण, शेवटी त्यांना सांगाव लागेल की, त्यांच्याकडे आलेला हा पैसा नेमका कुठून आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फेक करन्सीला नक्कीच आळा बसेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

आरबीआयचा निर्णय काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत 2000 च्या नोटा चलनात राहतील आणि व्यवहारही करता येतील, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यानंतर यावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

विरोधकांची टीका
काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय अतिशय बालिश आहे, अशी टीका केली तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी असले निर्णय परवडणारे नाहीत, अशा शब्दात मोदींवर टीका केली होती

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube